नवीन बातम्या
जे . एन.म्हात्रे यांनी भाजपाची सुपारी घेतली का? – सुदाम पाटील यांचा सवाल
उरण विधानसभा निवडणुकीतील महाविकास आघाडीतील बिघाडीवर काँग्रेस जिल्हाध्यक्षांचा टोला..
महाविकास आघाडीची भूमिका मान्य नसल्यामुळे बाहेर पडतोय” – माजी नगराध्यक्ष जे. एम. म्हात्रे यांची पत्रकार परिषदेत स्पष्ट भूमिका
*राज्य व जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या पुढाकाराने फिरते लोकन्यायालय व कायदेविषयक जनजागृती शिबिर यशस्वीरीत्या संपन्न*
शिवसेना उरण विधानसभा पनवेल तालुका सभा संपन्न
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्ष नवीन पनवेल शहर शाखेच्या वतीने शिवजयंती निमित्त विविध कार्यक्रम संपन्न
हिंदु संस्कृती जपण्याचे काम गेल्या अनेक वर्षापासून शिवशक्ती मित्र मंडळामार्फत केले जात आहे ः रायगड भूषण रमेश गुडेकर
स्वाभिमानी युथ रिपब्लिकन पार्टीचे रायगड जिल्हा अध्यक्ष महेश साळुंखे यांनी क्रांती स्तंभास अभिवादन
*पत्रकार संजय कदम यांना रोटरी क्लब ऑफ पनवेल सेंट्रलच्या वतीने देण्यात आला “शांतता आणि संघर्ष निवारण पुरस्कार*
सिडको ठेकेदारी सुरक्षा रक्षकांना रायगड जिल्हा सुरक्षा रक्षक मंडळामध्ये वर्ग करुन घ्या
हिन्द मजदूर किसान पंचायतचचे सामुहिंक आंदोलन

डॉ महाजन हॉस्पिटलमध्ये स्मार्ट आयसीयू युनिटला सुरूवात

फाल्कन आयसीयू सोबत हातमिळविणी करत मुंबईत दुसरे स्मार्ट आयसीयू युनिट सुरु

मुंबई – मृत्यूच्या दारात उभ्या असणाऱ्या रुग्णांना वाचवण्यासाठी रुग्णालयातील यंत्रणा महत्त्वाची भूमिका बजावते. अत्यंत गंभीर स्थिती असलेल्या रुग्णाला अतिदक्षता विभागात आणले जाते व त्यावर तातडीने उपचार केले जातात. अशा रुग्णांना उत्तमोत्तम उपचार मिळावे म्हणून डॉ महाजन हॉस्पिटलने पुढाकार घेतला आहे. नवीन तंत्रज्ञान व आधुनिक उपचार पद्धतीच्या माध्यमातून आरोग्यासंबंधी गंभीर गुंतागुतीवर मात करण्यासाठी होम क्रिटिकल केअरचे प्रणेते म्हणून ओळखल्या जाणाऱ्या फाल्कन आयसीयूने नुकतीच महाजन हॉस्पिटलशी हातमिळवणी करत मुंबईत दुसरे स्मार्ट आयसीयू युनिट स्थापन केले आहे.

अनुभवी तज्ज्ञ तसेच आधुनिक तंत्रज्ञानाच्या मदतीने चालवल्या जाणाऱ्या जागतिक दर्जाच्या आयसीयू सुविधांच्या वाढत्या गरजा लक्षात घेऊन ही सुविधा रुग्णांकरिता नक्कीच फायदेशीर ठरणार आहे.
फाल्कन आयसीयू संपूर्ण महाराष्ट्रात आरोग्यसेवेची सुलभता वाढवण्याच्या आपल्या वचनबद्धतेची अंमलबजावणी करते.

नवीन आयसीयू युनिट मुंबईतील गंभीर आजारांनी पिडीत रुग्णांना आवश्यक सुविधा प्रदान करण्यात महत्त्वाची भूमिका बजावणार आहे. फाल्कन आयसीयूच्या या योजनेच्या माध्यमातून  पुढील पाच वर्षांत भारतात अंदाजे ३००० आयसीयू बेड उपलब्ध करुन दिले जाणार आहे.

भारतात फाल्कन आयसीयू व्यतिरिक्त, सीसीयूची आंतरराष्ट्रीय स्तरावर एक उत्तम योजना आखण्यात आली आहे, जी आणखी १००० फाल्कन आयसीयू बेड जोडणार आहे.

पूर्व आफ्रिकन देशात सीसीयूने नैरोबी, केनिया येथे आपले कार्याची सुरूवात केली आहे. या विस्ताराचे उद्दिष्ट केवळ रुग्णसेवेत सुधारणा करणे नाही तर अत्याधुनिक तंत्रज्ञान आणि संसाधनांसह उत्तमोत्तम रुग्णसेवा पुरविली जाणार आहे.

डॉ महाजन हॉस्पिटलमधील आयसीयूमध्ये सर्वोत्तम रुग्णसेवा प्रणाली, रिअल-टाइम पेशंट ट्रॅकिंग आणि क्रिटिकल केअर तंत्रज्ञानातील प्रगती पहायला मिळणार आहे. या प्रगत साधनांचे एकत्रीकरण वैद्यकिय तज्ज्ञांना अचूक, वेळीच आणि प्रभावी उपचार प्रदान करण्यास सक्षम करेल, ज्यामुळे रुग्णांचे जगण्याचे प्रमाण आणि लवकर बरे होण्याच्या प्रमाणात सुधारणा दिसेल.

या शुभारंभ प्रसंगी बोलताना, क्रिटिकल केअर युनिफाइड (सीसीयू) चे कार्यकारी अध्यक्ष आणि फाल्कन आयसीयूचे संस्थापक श्री. राजीव माथूर सांगतात की,  भारतात क्रिटिकल केअर उपचारांमध्ये क्रांती घडवून आणणे हे आमचे ध्येय हे आहे. डॉ महाजन हॉस्पिटलमध्ये मुंबईतील आमच्या दुसऱ्या आयसीयू युनिटला सुरुवात करताना आम्ही उच्च-गुणवत्तेच्या आयसीयू सेवा देशातील अधिकाधिक रुग्णांपर्यंत पोहोचतील याची खात्री करत हे सकारात्मक पाऊल उचलत आहोत. येत्या काही वर्षांत, आम्ही देशभरातील आणखी काही रुग्णालयांमध्ये सुमारे 3000 आयसीयू बेड जोडण्याचे उद्दिष्ट समोर ठेवले आहे.

डॉ महाजन हॉस्पिटलचे वैद्यकीय संचालक आणि स्टेमआरएक्स बायोसायन्स प्रायव्हेट लिमिटेडचे रिजनरेटिव्ह मेडिसिन एक्स्पर्ट डॉ. प्रदीप महाजन सांगतात की,  महाजन हॉस्पिटल हे ५० बेडची क्षमता असलेले एक सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल आहे. आमच्या हॉस्पिटलमध्ये जागतिक दर्जाचे आयसीयू सेटअप असल्याने गंभीर स्थितीतील रुग्णांना सर्व प्रकारचे उपचार एकाच ठिकाणी उपलब्ध करुन देता येणार आहे. फाल्कन आयसीयूची प्रगत देखरेख प्रणाली आणि आधुनिक तंत्रज्ञानाने उपचारांमध्ये सुलभता प्राप्त होण्यास मदत होईल.

फाल्कन आयसीयूचे वरिष्ठ इंटेन्सिव्हिस्ट डॉ. अवधूत कुलकर्णी यांनी आयसीयू पायाभूत सुविधांबाबत  रुग्णालयांसमोरील आव्हानांवर चर्चा केली. मर्यादित संसाधनांमुळे अनेकदा संघर्ष करावा लागतो हे त्यांनी स्पष्ट केले. आमचे ध्येय हे अत्याधुनिक सेटअपसह ही तफावत भरून काढणे आहे असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले. ते सांगतात की, सीसीयू आणि स्थानिक रुग्णालयांमध्ये दर्जेदार सेवा उपलब्घ करुन देण्याची गरज आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back To Top