नवीन बातम्या
आंतरजिल्हा बदलीग्रस्त शिक्षकांचे आझाद मैदानात मुंडन आंदोलन
केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री पदाची दशकपुर्ती निमीत्त   रामदास आठवले यांचा भव्य नागरी सत्कार  
पनवेल महापालिकेच्या स्वतंत्र परिवहन सेवेला शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचा तीव्र विरोध; ‘आधी पाणी, रस्ते आणि पार्किंगच्या समस्या सोडवा’
एसआयआर मोहिमेत बूथस्तरीय अधिकारी घरोघरी न पोहोचल्याचा आरोप; शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांना निवेदन
उलवेच्या समिक्षा मढवीची चमकदार कामगिरी;
रायगडमध्ये चौथा तर पनवेल तालुक्यात प्रथम क्रमांक
उलवे शहर मनसे तर्फे सत्कार.
सापडलेली तीन लाखांची बॅग प्रामाणिकपणे पोलिसांच्या स्वाधीन; महिलेचे साहित्य सुखरूप परत
कॉक्रोच जनता पार्टीच्या मुंबईकर कॉक्रोचेसच्या संघटनात्मक कार्याचा आढावा
गरजू विद्यार्थ्यांना रोटरी क्लब पनवेल सनराईझचा शैक्षणिक मदतीचा हात
युवकांसाठी ‘व्हिजन भारत – जेन झी : संवाद ते संकल्प’ कार्यक्रम; भाजपा प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांची प्रमुख उपस्थिती

विविध गुन्ह्यातील 25 जप्त वाहनांचा पनवेल शहर पोलीस करणार जाहीर लिलाव


पनवेल, दि.14 (वार्ताहर) ः पनवेल शहर पोलीस ठाणे येथे विविध गुन्हयांमध्ये एकूण 25 वाहने जप्त करण्यात आलेली असून सदर वाहनांचे मुळ मालकांचा शोध घेतला परंतु ते मिळून येत नाहीत. सदरच्या गाडया बर्‍याच कालावधीपासून पोलीस ठाणे आवारात पडून आहेत. त्यांचे मुळ मालक मिळून येत नसल्याने प्रत्यक्ष लिलाव प्रक्रिया केली जाणार आहे.


तत्पुर्वी वरील नमुद वाहनांबाबत आजपर्यंत कोणीही सदर वाहनांचे मालकीबाबत दावा दाखल केलेला नाही. मा. प्रादेशिक परिवहन अधिकारी कळंबोली यांचेकडे उपलब्ध वाहनांचे आरटीओ रजि.नंबर, इंजिन नंबर, चेसीज नंबरची पडताळणी केली असता सदर वाहनांचे मालक मिळून आले नाहीत.

सदर गुन्हयातील जप्त वाहने ही भंगारात कश करून त्याचा लिलाव करण्याची मा. न्यायालयाने परवानगी दिली असून सदर वाहनांचा दिनांक 18/02/2025 रोजी 11.00 वा. रोजी पनवेल शहर पोलीस ठाणे आवारात लिलाव करण्यात येणार असून त्यासाठी इच्छुकांनी तत्पुर्वी पनवेल शहर पोलीस ठाण्याचे दुरध्वनी क. 8591424350 वर संपर्क साधावा, असे आवाहन वपोनि नितीन ठाकरे यांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back To Top