वंचित बहुजन आघाडीची मुंबईत संविधान महासभा


4k समाचार दि. 25
मुंबई दि. २५ : वंचित बहुजन आघाडीच्या वतीने आज सायंकाळी ५ वाजता दादर येथील शिवाजी पार्क मैदानावर “संविधान सम्मान महासभा” चे आयोजन करण्यात आले आहे. या ऐतिहासिक महासभेत पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि विचारवंत बाळासाहेब आंबेडकर यांचे मार्गदर्शन लाभणार आहे.


फुले–शाहू–आंबेडकरवादी विचारसरणीवर विश्वास ठेवणाऱ्या नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे. देशातील सामाजिक न्याय, समानता, संविधानिक मूल्यांचे संरक्षण आणि वंचित-बहुजन समाजाच्या हक्कांसाठीच्या संघर्षाच्या पार्श्वभूमीवर ही सभा अत्यंत महत्त्वाची ठरणार असल्याचे पक्षाने स्पष्ट केले आहे.
सभेला मुंबई आणि आसपासच्या भागातून मोठ्या प्रमाणात नागरिक उपस्थित राहण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back To Top