4k समाचार
पनवेल दि. ०४ ( संजय कदम ) : शहरातील ओरियन मॉल येथे असलेल्या आयप्लॅनेट स्टोअर नावाच्या मोबाईल दुकानात जवळपास १२ लाख ५० हजार रुपये किमतीच्या मोबाईल चोरी प्रकरणी ३ जणांना पनवेल शहर पोलिसानी ताब्यात घेतले आहे .

या गुन्ह्यातील मुख्य आरोपी अशोक ज्योतिष घराई रा.ओरिसा याने दुकानातील त्याच्याकडे ९ आयफोन ची विक्री करून त्याच्याकडे जमा असलेली रोख रक्कम ही कंपनी कडे जमा न करता तसेच बनावट पेबॉय लिंकवर खोटे बिल तयार करून काही आयफोन मोबाईल व काही रोख रकमेचा अपहार करून कंपनीची फसवणूक करून तो ओडिसा येथे पसार झाला होता

याबाबतची तक्रार पनवेल शहर पोलीस ठाण्यात दाखल होताच वपोनि नितीन ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक हजरत पठाण, पोहवा सूर्यकांत कुडावकर, प्रवीण मेथी,रवींद्र पारधी, पोलीस शिपाई शशिकांत काकडे, साईनाथ मोकळ आदींच्या पथकाने तांत्रिक तपासाच्या आधारे व गुप्त बातमीदार च्या मदतीने या गुन्ह्यातील मुख्य आरोपी अशोक ज्योतिष घराई हा ओरिसा येथील एका गावात लपल्याची माहिती मिळाली त्यानुसार स्थानिक पोलिसांच्या मदतीने तेथिल नदी पार करून त्याला ताब्यात घेतले असता त्याने दिलेल्या माहिती नुसार त्याला चोरीस मदत करणारा रजत सिंग व चोरीचे मोबाईल विकत घेणारा विशाल दोषी रा. ताडदेव मुंबई यांना दाखल गुन्ह्याचे कामी अटक करून पोलीस कस्टडी घेण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली .
