नवीन बातम्या
केदार भगत यांच्यातर्फे दिवाळीनिमित्त सुवासिक उटण्याचे वाटप उटण्याच्या पाकिटांवर ‘पाणी वाचवा, जीवन वाचवा’चा संदेश; रामशेठ ठाकूर यांनी केले कौतुक
Open Channels FM: Web Summit Gender In Tech Report Reveals Gaps in Tech Leadership, Pay, and AI for Women
साईनाथ पवार यांना मानद डॉक्टरेट पदवीसह ‘महाराष्ट्र भूषण’ पुरस्कार दिव्यांग बांधवांच्या सेवेसाठी केलेल्या सामाजिक कार्याचा गौरव; पुण्यात दोन्ही सन्मान प्रदान
अनंत गीते यांच्या हस्ते शिवसेनेच्या दिवाळी सुगंधी उटण्याच्या उपक्रमाचा शुभारंभ  उपनेते बबनदादा पाटील यांच्यासह पदाधिकारी, महिला आघाडी व शिवसैनिकांची उपस्थिती
डेरवली जिल्हा परिषद शाळेत आकाशकंदील कार्यशाळा उत्साहात विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग; पर्यावरणपूरक दिवाळीचा दिला संदेश
दुकानदारांच्या समस्या आणि महागाईच्या प्रश्नावर संघटना आक्रमक
कोल्हापूरच्या दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना पनवेलच्या शिवसैनिकाचा मदतीचा हात
राहुल गोगटे यांच्या पुढाकाराने २०० जीवनावश्यक वस्तूंच्या किटचे वाटप
प्रशांत सोनवणे यांच्या अभिष्टचिंतन सोहळ्यानिमित्त १०० महिलांना साड्यांचे वाटप ९ नोव्हेंबरला जुने पनवेल येथे आयोजन; आंबेडकरी चळवळीतील ज्येष्ठ कार्यकर्त्यांचा स्वाभिमानी पुरस्काराने सन्मान
अखिला मेमोरियल ट्रस्टतर्फे आदिवासी बांधवांना दिवाळी भेट

१२ व्या राज्यस्तरीय ‘अटल करंडक’ एकांकिका स्पर्धेच्या महाअंतिम फेरीला शानदार सुरुवात





4kNews
पनवेल (प्रतिनिधी)  श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ पुरस्कृत आणि अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद पनवेल शाखा व चांगू काना ठाकूर महाविद्यालय (स्वायत्त) यांच्या संयुक्त विद्यमाने दरवर्षी प्रमाणे यंदाही आयोजित करण्यात आलेल्या राज्यस्तरीय ‘अटल करंडक’ एकांकिका स्पर्धेच्या अंतिम फेरी सोहळ्याचे उद्घाटन पनवेलमधील आद्य क्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृहात सुप्रसिद्ध अभिनेते गिरीश ओक, सुप्रसिद्ध दिग्दर्शिका प्रतिमा कुलकर्णी, सुप्रसिद्ध अभिनेते सुनील तावडे यांच्या हस्ते आज (दि. ०५) शानदारपणे झाले. तीन दिवस चालणाऱ्या या महाअंतिम फेरीत राज्यभरातून १०० हुन अधिक एकांकिकांमधून निवड झालेल्या उत्कृष्ट २५ एकांकिका सादर होणार असून नाट्य रसिकांना मोठी मेजवानी मिळाली असून  विशेष म्हणजे या सोहळ्याला युवा ते ज्येष्ठ नाट्य रसिकांची मोठी गर्दी पहायला मिळाली.  


    १२ व्या पर्वाच्या या सोहळयाच्या प्रारंभाला प्रमुख मान्यवर म्हणून अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद पनवेल शाखा उपाध्यक्ष व स्पर्धा प्रमुख आणि पनवेल महानगरपालिकेचे माजी सभागृहनेते परेश ठाकूर, भाजपचे उत्तर रायगड जिल्हा सरचिटणीस नितीन पाटील, माजी शहर अध्यक्ष जयंत पगडे, माजी नगरसेवक अनिल भगत, अजय बहिरा, राजू सोनी, महिला मोर्चाच्या शहर अध्यक्षा रुचिता लोंढे, माजी नगरसेविका दर्शना भोईर, सुरेखा मोहोकर, प्रीती जॉर्ज, सुरेखा कल्याणकर, नलिनी शेलार, सिद्धीका पुंजानी, युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष आनंद ढवळे, सुप्रसिद्ध अभिनेता भरत सावले, अभिनेते व दिग्दर्शक राजा अत्रे, सीकेटी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एस. के. पाटील,  जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेचे संचालक संजय भगत, शहर सरचिटणीस अमित ओझे, प्रीतम म्हात्रे, रुपेश नागवेकर, जिल्हा उपाध्यक्ष मयुरेश नेतकर, संजय जैन, पवन सोनी, पनवेल शहर युवा मोर्चाचे शहराध्यक्ष हिमेश बहिरा, आरती तायडे, मनिषा बहिरा तसेच कार्यवाह श्यामनाथ पुंडे, सांस्कृतिक सेलचे जिल्हाध्यक्ष अभिषेक पटवर्धन, चिन्मय समेळ, अमोल खेर, गणेश जगताप, वैभव बुवा आदी उपस्थित होते.  


   महाअंतिम फेरीच्या पहिल्या दिवशी वसंतराव नाईक विज्ञान संस्था नागपूरची एकांकिका ‘वि. प्र’, मुलुंड वाणिज्य विद्यालय ‘स्वातंत्र्य सौभाग्य’, मिथक मुंबईची ‘कारण काय’, एकदम कडक नाट्य संस्था भाईंदरची ‘ बकेट लिस्ट’,, वि. ग. वझे विद्यालय मुलुंडची ‘द गर्दभ’, आर्टस कॉमर्स अँन्ड सायन्स कॉलेज साताराचे ‘सोयरीक’, नाट्य स्पर्श आणि भवन्स महाविद्यालय अंधेरीची ‘प्रतीक्षायान’, राजाराम बापू अभियांत्रिकी महाविद्यालय इस्लामपूरची ‘हाफ वे’, कलादर्पण पनवेलची ‘आख्यान- ए – झुरळ’, आणि रेवन एंटरटेनमेंट पुणेची ‘सांग रहियो’ या दहा एकांकिकांचे सादरीकरण होते.  उर्वरित १५ एकांकिका शनिवार व रविवारी सादर होणार आहेत. स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ ०७ डिसेंबर रोजी होणार असून स्पर्धेतील विजेत्या एकांकिकेला ०१ लाख रूपये आणि मानाचा ‘अटल करंडक’ देऊन मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात येणार आहे. तसेच ज्येष्ठ रंगकर्मी नीना कुलकर्णी आणि सुप्रसिद्ध अभिनेते व निर्माता सुनिल बर्वे यांचा “गौरव रंगभूमीचा” पुरस्काराने सन्मान करण्यात येणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back To Top