नवीन बातम्या
नवी मुंबई-रायगडमध्ये ‘EODR 2.0’चे आयोजन
४० हून अधिक विकासकांचा सहभाग; १,५०० हून अधिक गृहनिर्माण संस्थांना जोडण्याचे उद्दिष्ट
आमदार प्रशांत ठाकूर यांनी सार्वजनिक मंडळांसह घरगुती गणरायाचे घेतले दर्शन
ढोल-ताशांच्या गजरात विमानतळावर अवतरली महाराष्ट्राची लोकसंस्कृती
नगरपरिषद कर्मचाऱ्यांचे प्रश्न मार्गी लागणार; आयुक्त  अभिषेक कृष्णा यांच्यासमवेत संघर्ष समितीची यशस्वी बैठक

रिटघर गावाची ‘एक गाव, एक गणपती’ची ५२ वर्षांची अखंड परंपरा
आदिवासी बांधवांसोबत गणेशोत्सवाचा आनंद; महिला, पुरुष व चिमुकल्यांचा सन्मान
महापौर निवासस्थानी चाफेवाडी, फणसवाडीतील नागरिकांच्या हस्ते गणरायाची आरती; क्रिकेट संघांना क्रीडा साहित्याकरिता आर्थिक मदत
५२ महाविद्यालयांचा सहभाग; सी.के.टी. महाविद्यालयात आंतरमहाविद्यालयीन फुटबॉल स्पर्धेला सुरुवात
एईआरए दर सवलतींमुळे नवी मुंबई विमानतळावरून आंतरराष्ट्रीय प्रवास अधिक स्वस्त होणार
पर्यावरण संवर्धनाचा संदेश देत ‘ग्रीन गणेशा’ उपक्रमाला सुरुवात; संचालक सोमनाथ मलगर यांचे विशेष पुढाकार आणि मार्गदर्शन

महापरिनिर्वाण दिनानिमित्त करंजाडे-पनवेलमध्ये कॅंडल मार्चचे आयोजन





4k News   पनवेल (प्रतिनिधी) 
परम पूज्यनीय बोधीसत्व भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ६९ व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त करंजाडे तसेच पनवेल परिसरात कॅंडल मार्चचे आयोजन करण्यात आले. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक, सेक्टर ३–अ करंजाडे येथून प्रारंभ झालेला हा कॅंडल मार्च भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक, पनवेल येथे येऊन समारोप झाला.



महापरिनिर्वाण दिनानिमित्त डॉ. आंबेडकरांना विनम्र अभिवादन अर्पण करण्यासाठी मोठ्या संख्येने अनुयायी, नागरिक, युवक-युवती तसेच सामाजिक संस्था सहभागी झाल्या.
या कॅंडल मार्चमध्ये भारतीय बौद्ध महासभा विभाग क्र. १४ करंजाडे, प्रबुद्ध सामाजिक संस्था (रजि.) करंजाडे–पनवेल, बौद्धजन पंचायत समिती शाखा क्र. ८६३ करंजाडे, भारतরত्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर नगर – करंजाडे, तसेच माता रमाई आंबेडकर नगर – वडघर या संस्थांचा विशेष सहभाग होता. 



मार्चदरम्यान सहभागी नागरिकांनी संविधान, समता, बंधुता आणि मानवतावादाच्या मूल्यांचा संदेश देत डॉ. आंबेडकरांच्या कार्याचे स्मरण केले. परिसरात शांतता, अनुशासन आणि श्रद्धेचे वातावरण पाहायला मिळाले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back To Top