पनवेल दि.०७(वार्ताहर): पनवेल मध्ये अचानकपणे मंगळवारी रात्री तसेच बुधवारी धुपरी अचानकपणे आलेल्या अवकाळी पावसाचा फटका शहरी भागासह ग्रामीण भागाला बसून काही ठिकाणी आगी लागण्याचे प्रकार तर काही ठिकाणी मोठं मोठे वृक्ष उन्मळून पडले आहेत. अनेक ठिकाणी विद्युत पुरवठाही खंडित झाला होता.

आज करंजाडे ग्रामपंचायत ऑफिसमध्ये सीसीटीव्ही कॅमेरा सर्वर बॉक्सला आग लागली होती याची माहिती पनवेल महानगर पालिका अग्नीशमन दलाला मिळताच त्यांचे पथक घटनास्थळी पोहचले यावेळी पाहणी केली असता असे निदर्शनास आले की, ग्रामपंचायत मध्ये पहिल्या मजल्यावर असणाऱ्या कॅमेरा सर्वर बॉक्सला शॉर्ट सर्किट मुळे आग लागली होती सदर आग तेथील रहिवाशी यांनी पाणी मारून आग विझविली होती यावेळी सदर पथकाने पाहणी करून कोणताही धोका नसल्याची खात्री करून घेतली.

दरम्यान त्याचवेळी शहरातील किंग इलेक्ट्रॉनिक, तक्का जवळ झाड पडले असल्याची माहिती या पथकाला मिळताच ते परस्पर झाड पडल्याच्या ठिकाणी जाऊन पाहणी केल्या असता झाड रस्त्याच्या मधोमध पडलेले निदर्शनास आले. यावेळी त्यांनी चैन सॉ कटर च्या साह्याने झाडाच्या फांद्यांचे बारीक तुकडे केले आणि रस्ता रहदारी करता मोकळा करून दिला.

त्याचवेळी शहरातील काँग्रेस भवन येथे ट्रान्सफॉर्मवरला आग लागली आहे अशी माहिती मिळतात सदर पथक वाहनांसह घटना स्थळी जाऊन पाहणी केली असता असे निदर्शनास आले की ट्रांसफार्मरच्या वोल्टेज बुशला आग लागली आहे सदर ठिकाणी करंट सप्लाय लाईन चालू असल्याने तेथील एम एस सी बी च कर्मचारी यांनी करंट सप्लाय लाईन बंद केली आणि आग विझवली
