4k समाचार
उरण परिसरात बनावट चावीने घराचा दरवाजा उघडून तब्बल १३ लाख ७१ हजार रुपयांचे दागिने आणि रोकड चोरी झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. ही चोरी दिवसाढवळ्या घडली असून, परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, रजु सुऱ्हे हे टेलरिंगचे काम करणारे असून, घटनेच्या दिवशी ते उरण येथे कामानिमित्त बाहेर गेले होते. याच संधीचा फायदा घेत अज्ञात चोरट्यांनी घरासमोरील मुख्य दरवाजा बनावट चावीने उघडला. घरात शिरून चोरट्यांनी कपाटातील सोन्याचे दागिने व रोकड असा एकूण १३ लाख ७१ हजार रुपयांचा ऐवज लंपास केला.

घटनेची माहिती मिळताच स्थानिक पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला आहे. पोलिसांकडून परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासण्याचे काम सुरू असून, चोरट्यांचा लवकरच शोध लागेल, असा विश्वास पोलिसांनी व्यक्त केला आहे. या घटनेमुळे परिसरातील नागरिकांमध्ये चोरीच्या वाढत्या घटनांबाबत चिंतेचे वातावरण आहे.
