4k समाचार
उरण दि 16 (विठ्ठल ममताबादे )उरण नगरपरिषदचे माॅसाहेब मीनाताई ठाकरे वाचनालय येथे मराठी शब्द आणि अंक सुलेखनाचे गाढे अभ्यासक मनोहर जामकर यांनी लायब्ररी आणि अभ्यासिकेमधील विद्यार्थ्यांना जुनी बाराखडी आता शासन निर्णयानुसार नव्याने ४ शब्द अधिकचे समाविष्ट करून सोळाखडीचे प्रदर्शनीच्या माध्यमातून प्रत्यक्ष प्रात्यक्षिके विविध ईंस्ट्रूमेंटच्या सहाय्याने प्रत्यक्ष सुलेखन करून घेतले.या वेळी विद्यार्थ्यांनी अतीशय उत्तम व उत्स्फूर्तपणे प्रतिसाद दिला.

यावेळी मनोहर जामकर यांनी मराठी भाषेचा इतिहास समजावून दिला आणि मराठी भाषा वृद्धिंगत करण्यासाठी आपला सर्वांचा सहभाग नक्की मिळेलच ही अपेक्षा व्यक्त केली.सर्व विद्यार्थ्यांनी छान प्रतिसाद दिला.यावेळी मनोहर जामकर यांचा सत्कार ग्रंथपाल संतोष पवार, सहकारी जयेश वत्सराज यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी ॲड पल्लवी जगदाळे,ॲड निरंतर सावंत, दिपक वायदांडे, चेतन सोदारी, अलंकार म्हात्रे, नाझीया शेख, नंदन पानसरे,हर्षवर्धन पवार, कल्पेश देवरे, डॉ प्रतिक टोगे, रश्मी म्हात्रे, जय दाभोळकर, सारा पवार, जय वत्सराज व साहिल सैनी हे उपस्थित होते.

मराठी भाषाचा जास्तीत जास्त प्रचार, प्रसार व्हावा.मराठी भाषा अधिक वृद्धिंगत व्हावी, तीचे जतन, संवर्धन व्हावे, मराठी भाषेची सर्वांना गोडी निर्माण व्हावी, मराठी भाषेचा इतिहास सर्वांना समजावा या दृष्टीकोणातून सदर सुलेखन प्रशिक्षण उपक्रमाचे आयोजन करण्यात आल्याची माहिती मराठी अंक, सुलेखनाचे गाढे अभ्यासक मनोहर जामकर यांनी दिली.
