4K समाचार
उरण दि 16 (विठ्ठल ममताबादे )शिवसेनाप्रमुख वंदनीय बाळासाहेब ठाकरे आणि धर्मवीर आनंद दिघे, पक्षाचे मुख्य नेते उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे तसेच संसदरत्न खासदार श्रीरंग आप्पा बारणे यांच्या कार्यप्रणालीवर व विचारांवर प्रेरित होऊन मंगळवार दिनांक १४/१०/२०२५ रोजी शिवसेनेमध्ये उरण तालुक्यातील अनेक कार्यकर्त्यांनी पक्षप्रवेश केला.

याप्रसंगी उरण विधानसभेचे रायगड जिल्हाप्रमुख अतुल शेठ भगत तसेच उरण तालुकाप्रमुख दीपक ठाकूर, विधानसभा संपर्कप्रमुख रमेश म्हात्रे, रायगड जिल्हा संघटक महेंद्र पाटील, तालुका संपर्कप्रमुख चंद्रकांत पाटील, उरण शहर प्रमुख सुलेमान शेख, चाणजे विभाग प्रमुख अक्षय म्हात्रे त्यांच्या समवेत अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.शिवसेना मध्यवर्ती कार्यालय उरण येथे झालेल्या शिवसेना पक्षप्रवेशांमध्ये रफिक रशीद शेख चारफाटा उरण,भारत शेंडगे चार फाटा,योगेश पाटील, विकी झुवाटकर, उस्मान खान,अशोक मोटे,आतिश झावरे,पंकेश पाटील, सुशांत पाटील, योगेश भोसले समीर केळकर आदीनी पक्ष प्रवेश केला.

याप्रसंगी बोलताना जिल्हाप्रमुख अतुल भगत यांनी सर्व कार्यकर्त्यांचा शिवसेना पक्षांमध्ये स्वागत करून शिवसैनिक म्हणून पुढील राजकीय प्रवासात व सामाजिक कार्यात पक्ष संघटना आणि उरण विधानसभेचे सर्व पदाधिकारी हे तुमच्या खांद्याला खांदा लावून काम करतील अशी ग्वाही देऊन सर्वांचे आभार मानले तसेच या प्रवेशासाठी खास मेहनत घेतलेले सुलेमान शेख शहर प्रमुख तसेच दशरथ चव्हाण वाहतूक सेना उरण यांचे देखील विशेष अभिनंदन केले.
