4K समाचार
उरण दि 16 (विठ्ठल ममताबादे )उरण तहसील कार्यालयात जाऊन राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या महाराष्ट्र राज्य उपाध्यक्षा भावनाताई घाणेकर यांनी तहसीलदार उद्धव कदम यांची भेट घेतली.उरण मतदार संघामध्ये विधानसभा निवडणुकीपर्यंत असलेल्या डुप्लिकेट मतदार, हटवलेले मतदार आणि नवे जोडलेले मतदार यांची जवळ जवळ साडेअकराशे पानांच्या याद्या सुपूर्द केले.

आक्षेप आणि सूचना करण्याची शेवटची तारीख असल्याने भावना घाणेकर यांनी तहसीलदारांकडे मतदार संदर्भात हरकती घेऊन विविध समस्या तहसीलदारांच्या निदर्शनास आणून दिल्या.यामध्ये उरण विधानसभेच्या निवडणुकीत जवळजवळ ६० हजाराहून अधिक मतदार हे बोगस मतदार असल्याचे निदर्शनास आणून दिले. उरण विधानसभा मतदार संघातील / क्षेत्रातील मतदारांची चौकशी करून योग्य ती कार्यवाही करण्यात येईल असे तहसीलदार यांनी आश्वासित केले.असे भावनाताई घाणेकर यांनी यावेळी सांगितले. तहसीलदार उद्धव कदम यांनीही सकारात्मक प्रतिसाद देत योग्य ती खबरदारी घेण्याचे आश्वासन दिले.
