नवीन बातम्या
सापडलेली तीन लाखांची बॅग प्रामाणिकपणे पोलिसांच्या स्वाधीन; महिलेचे साहित्य सुखरूप परत
कॉक्रोच जनता पार्टीच्या मुंबईकर कॉक्रोचेसच्या संघटनात्मक कार्याचा आढावा
गरजू विद्यार्थ्यांना रोटरी क्लब पनवेल सनराईझचा शैक्षणिक मदतीचा हात
युवकांसाठी ‘व्हिजन भारत – जेन झी : संवाद ते संकल्प’ कार्यक्रम; भाजपा प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांची प्रमुख उपस्थिती
पनवेलचे अनिरुद्ध (मंदार) भिडे यांना आकाशवाणी मुंबईकडून सुगम संगीतासाठी ‘ए ग्रेड’ गायकाचा मान
गायन क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरीची दखल; गुरुजनांसह आई-वडील, पत्नी, कुटुंबीय व शुभचिंतकांप्रती व्यक्त केली कृतज्ञता
विभाजन विभीषिका दिनानिमित्त पनवेलमध्ये डॉ. उदय निरगुडकर यांचा विशेष संवाद
‘१९४७ ची फाळणी आणि आजची वैचारिक फाळणी; नेमकं काय घडलं?’ या विषयावर होणार विचारमंथन
राज्यातील राज्यस्तरीय पत्रकार प्रेरणा पुरस्कार जाहीर; ज्येष्ठ पत्रकार संजय कदम यांना जीवनगौरव पुरस्कार जाहीर
परिमंडळ 3 सहाय्यक पोलीस आयुक्तपदी मयुर भुजबळ ; पदभार स्वीकारला
राज्यातील राज्यस्तरीय पत्रकार प्रेरणा पुरस्कार जाहीर

पनवेल मेल मोटर डेपोमध्ये ‘Blood for Ambedkar’ उपक्रमांतर्गत रक्तदान शिबिर उत्साहात संपन्न; ४० रक्तदात्यांचा उत्स्फूर्त सहभाग

4kNews 
पनवेल दि. ०९(वार्ताहर): भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनाचे औचित्य साधून, पनवेल येथील मेल मोटर डेपो (डाक विभाग) येथे भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. ‘All India Postal SC/ST Employees Welfare Association’ च्या वतीने “Blood for Ambedkar” या वेगळ्या आणि सामाजिक संकल्पनेअंतर्गत हा उपक्रम राबवण्यात आला. 


  या कार्यक्रमासाठी मेल मोटर सेवा, मुंबईचे वरिष्ठ व्यवस्थापक श्री. हेमंतकुमार सिंग हे विशेष निमंत्रक म्हणून उपस्थित होते. तर कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून ‘All India Postal SC/ST Employees Welfare Association’ चे सर्कल सचिव श्री. जयराम जाधव यांची प्रमुख उपस्थिती लाभली. मान्यवरांच्या हस्ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. 

डॉ. बाबासाहेबांना केवळ शब्दांनी नव्हे तर कृतीने आदरांजली वाहण्यासाठी आयोजित केलेल्या या शिबिराला उस्फूर्त प्रतिसाद मिळाला. या शिबिरात एकूण ४० स्वयंसेवकांनी उत्साहाने रक्तदान केले. रक्ताचा तुटवडा भरून काढण्यासाठी आणि रुग्णांचे प्राण वाचवण्यासाठी डाक विभागातील कर्मचाऱ्यांनी दाखवलेली ही सामाजिक बांधिलकी कौतुकास्पद ठरली. “Blood for Ambedkar” या संकल्पनेद्वारे डॉ. बाबासाहेबांचे मानवतावादी विचार पुढे नेण्याचा प्रयत्न आयोजकांनी केला, ज्याचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back To Top