असाच इनरव्हिल मार्फत दरवर्षी राबविला जाणारा उपक्रम म्हणजे ” हॅपी स्कुल ” . या उपक्रमाअंतर्गत क्लब मार्फत आपल्या जवळच्या परिसरातील जिल्हा परिषदेची एखादी गरजु शाळा निवडून तेथे त्या शाळेला आवश्यक असणाऱ्या बाबींची स्वनिधीतून पूर्तता करण्याचा प्रयत्न केला जातो .

असाच एक हॅपी स्कुल बनविण्याचा उपक्रम इनरव्हिल क्लब ऑफ पनवेल सिटी यांच्या मार्फत नानोशी जि . रायगड या आदिवासी गावातील रायगड जिल्हा परिषदेच्या शाळेत नुकताच रावबिण्यात आला . याठिकाणी क्लबमधील जवळजवळ ३५/४० सदस्यांनी मिळून एक लाखांपेक्षा जास्त निधी जमा करून शाळेच्या वर्गाला आतुन बाहेरून अतिशय सुंदर असे शैक्षणिक पेंटिंगचे काम करून देण्यात आले . तसेच शाळेची सुरक्षा भिंत व पाण्याच्या टाकीलाही सुंदर अशा चित्रांच्या सहाय्याने रंगविण्यात आले .

इतकेच नाही तर वर्गात पुस्तके ठेवण्यासाठी कपाट , खुर्च्या, टेबल, मुलांना बसण्यासाठीचे बेंचेस, चप्पल स्टँड, खेळाचे साहित्य , व मुलांना गणवेश इ . साहित्यदेखील या संस्थेमार्फत देण्यात आले . अतिशय कमी वेळात अध्यक्षा सौ प्रतिभा डांगी व माजी अध्यक्षा सौ . ध्वनी तन्ना यांनी प्रयत्न करून शाळेच्या मुख्य शिक्षिका सौ . सोनल गावंड यांच्या मदतीने शाळेचे रंगरूप बदलून टाकले .

या कामी सौ . अर्चना परेश ठाकुर यांनी तसेच त्यांच्या वीर वुमेन्स फाउंडेशन या संस्थेने तसेच अरिहंत पेन्टस् – पनवेल यांनीदेखीलआर्थिक सहाय्य करू न मोलाची मदत केली . दिनांक ०६/०५/२०२५ रोजी इनरव्हील क्लबच्या जिल्हाध्यक्षा डॉ . सौ . शोभना पालेकर यांच्याहस्ते कायापालट केलेल्या नवीन वर्गाचे उद्धाटन करण्यात आले . यावेळी अध्यक्षा सौ . प्रति भा डांगी, माजी अध्यक्षा सौ . ध्वनी तन्ना, सेक्रेटरी सौ . वैशाली करारिया, खजिनदार सौ हेतल बालड, एडिटर सौ . ममता ठक्कर, सौ . विजयता कोठारी, सौ . मिनी राजपुत, सौ . अरुंधती बंडसोडे ,सौ शिल्पी भोनसुले, सौ . तनिशा चेतवानी, सौ . प्रिया चातुर्वेदी तसेच वीर वुमेन्स फाऊंडेशनच्या सौ . किर्ती मुनोत व सौ . श्रुती निसर शिक्षिका सौ सोनल गावंड, शिक्षक गणेश खैरे,संगीता राजेंद्र पाटील -सरपंच ग्राम पंचायत नानोशी, अंकिता हुदार केंद्रप्रमुख: ओवळे
शा.व्य.स. अध्यक्षा सीमा पारधी
विमल ठाकरे उपाध्यक्ष
तुळसा ,गिरा,

पालक व ग्रामस्थ उपस्थित होते . उपास्थितांकडून मनापासुन संस्थेच्या कार्याचे कौतुक करण्यात आले . यावेळी शाळेतील विद्यार्थ्यानी डान्स मार्फत आपल्या संस्कृती चे प्रदर्शन करून उपास्थितांची मने जिंकली . कार्यक्रमानंतर मुलांना खाऊचे वाटप करण्यात आले .
