नवीन बातम्या
WordPress.org blog: WordPress 7.0.3 release
वाढदिवसाचे सामाजिक औचित्य! महेश साळुंखे यांच्या पुढाकाराने गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान
How to Price Your Online Course: One-Time vs Subscription vs Membership
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या समवेत भारतीय मजदूर संघाच्या प्रतिनिधींची विविध कामगार प्रश्नांवर महत्त्वपूर्ण बैठक संपन्न.
ऑल इंडिया एअरपोटर्स एव्हिएशन एम्प्लॉईज युनियनच्या उपाध्यक्षपदी बाळासाहेब नाईक यांची नियुक्ती
लोकनेते रामशेठ ठाकूर हे समाजसेवेतील ‘हिरा’; त्यांच्या नेतृत्वाने जनार्दन भगत शिक्षण संस्थेने महाराष्ट्राचा नावलौकिक वाढवला –  आमदार रविशेठ पाटील
जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या मुख्य प्रशासकीय कार्यालयासह भागूबाई चांगू ठाकूर कॉलेज ऑफ लॉच्या भव्य मूट कोर्टचे उद्घाटन
आमदार प्रशांत ठाकूर यांच्या वाढदिवसानिमित्त शास्त्रीय संगीताच्या मार्गदर्शनपर प्रात्यक्षिकाने रंगली सुरेल मैफल; विदुषी शुभदा पराडकर यांचे शास्त्रीय संगीतप्रेमी व युवा कलाकारांना मोलाचे मार्गदर्शन
आमदार प्रशांत ठाकूर यांच्या वाढदिवसानिमित्त बालग्रामला जीवनोपयोगी वस्तूंची मदत
रुचिता लोंढे-समेळ यांचा स्तुत्य उपक्रम; ‘फुलं-हारांऐवजी लोकोपयोगी कामात सहभागी व्हा’ या आवाहनाला प्रतिसाद
पनवेलचे लोकप्रिय आमदार मा. श्री. प्रशांत ठाकूर साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या चांगू काना ठाकूर आर्ट्स, कॉमर्स अँड सायन्स महाविद्यालयात (अधिकारप्रदत्त स्वायत्त) शनिवार, दि. ८ ऑगस्ट रोजी ‘भव्य रोजगार मेळावा २०२६’चे आयोजन

उरणच्या प्रतिक दर्णेची जागतिक शरीरसौष्ठव स्पर्धेसाठी निवड.



4k समाचार

उरण दि १(विठ्ठल ममताबादे )रायगड जिल्हा हौशी शरीर सौष्ठव संघटनेतील उरण येथील राष्ट्रीय शरीर सौष्ठवपटू प्रतिक प्रविण दर्णे याची निवड United World Sports Fitness Federation तर्फे थायलंडमधील पटाया येथे होणाऱ्या ‘मि. आशिया’ आणि ‘मि. वर्ल्ड’ या प्रतिष्ठीत जागतिक शरीरसौष्ठव स्पर्धांसाठी भारतीय संघात झाली आहे. ही स्पर्धा २७ ते २९ नोव्हेंबरदरम्यान होणार आहे. 



यापूर्वी प्रतिकने रायगड श्री’, ‘द्रोणगिरी श्री’ आणि ‘महाराष्ट्र कुमार’ हे किताब आपल्या नावावर केले असून, आता त्याचे लक्ष जागतिक पातळीवर भारताचे नाव उज्ज्वल करण्याचे आहे. उरण तालुक्यातील एका छोट्या खेड्यातून प्रगतीच्या पायऱ्या चढत प्रतिक आज जागतिक व्यासपीठावर पोहोचला आहे. आपल्या यशाचे श्रेय त्याने रायगड जिल्हा हौशी शरीर सौष्ठव संघटना, तसेच संतोष साखरे, जितेंद्र गुरव, ट्रेरेन्स फर्नाडिस आणि नंदकिशोर शिंदे यांना दिले आहे.



रायगड जिल्हा हौशी शरीरसौष्ठव संघटना ही महाराष्ट्र हौशी शरीर सौष्ठव संघटना व अमॅच्युअर बॉडी बिल्डिंग फेडरेशन ऑफ इंडिया यांच्याशी संलग्न असून, या संघटनांतर्फे दरवर्षी जिल्हा, राज्य व राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धांमधून आंतरराष्ट्रीय स्पर्धांसाठी खेळाडूंची निवड केली जाते. प्रतिकच्या या आंतरराष्ट्रीय निवडीबद्दल रायगड जिल्ह्यासह उरण तालुक्यातून सर्वत्र कौतुकाची लाट उसळली असून,सर्वच क्षेत्रातून प्रतीक वर शुभेच्छा व अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.त्याच्याकडून भारताला पदकाची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back To Top