पनवेल, दि.23 (वार्ताहर) ः पनवेल रेल्वे स्थानक परिसरातून एक इसम बेपत्ता झाला असून त्याचा शोध पनवेल रेल्वे पोलीस करीत आहेत.

बरलंगप्पा केदार वारी (24 रा.आसाम) असे या इसमाचे नाव असून उंची 5 फुट 3 इंच, अंगाने सडपातळ, रंग गोरा, नाक सरळ, डोळे काळे पांढरे असून, अंगात गुलाबी रंगाचा टी-शर्ट व काळ्या रंगाची जिन्स पॅन्ट घातलेली आहे. तो पनवेल रेल्वे स्थानकातून फलाट क्र.6/7 येथून मिसींग झाला आहे.

त्याच्या डाव्या डोळ्याच्या बाजूला नाकावर काळा तिळ आहे. या इसमाबाबत कोणाला अधिक माहिती असल्यास त्यांनी पनवेल रेल्वे पोलीस ठाण्यातील म.पोहवा. एस.एस.बोराटे मो.नं.9821425404 किंवा पनवेल रेल्वे पोलीस 27457122 येथे संपर्क साधावा.
