मनसेच्या दोन जिल्हाप्रमुखांमध्ये निर्माण झालेला वाद चांगलाच विकोपाला गेला आहे. अविनाश जाधव यांनी समीर मोर यांच्या भावाला मारहाण केल्याची माहिती समोर आली आहे.

या घटनेमुळे मनसेमध्ये तणावाचे वातावरण निर्माण झाले असून हा विषय थेट पक्षप्रमुख राज ठाकरे यांच्या दरबारात पोहोचला आहे. आता या प्रकरणावर राज ठाकरे काय भूमिका घेतात, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
