नवीन बातम्या
आंतरजिल्हा बदलीग्रस्त शिक्षकांचे आझाद मैदानात मुंडन आंदोलन
केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री पदाची दशकपुर्ती निमीत्त   रामदास आठवले यांचा भव्य नागरी सत्कार  
पनवेल महापालिकेच्या स्वतंत्र परिवहन सेवेला शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचा तीव्र विरोध; ‘आधी पाणी, रस्ते आणि पार्किंगच्या समस्या सोडवा’
एसआयआर मोहिमेत बूथस्तरीय अधिकारी घरोघरी न पोहोचल्याचा आरोप; शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांना निवेदन
उलवेच्या समिक्षा मढवीची चमकदार कामगिरी;
रायगडमध्ये चौथा तर पनवेल तालुक्यात प्रथम क्रमांक
उलवे शहर मनसे तर्फे सत्कार.
सापडलेली तीन लाखांची बॅग प्रामाणिकपणे पोलिसांच्या स्वाधीन; महिलेचे साहित्य सुखरूप परत
कॉक्रोच जनता पार्टीच्या मुंबईकर कॉक्रोचेसच्या संघटनात्मक कार्याचा आढावा
गरजू विद्यार्थ्यांना रोटरी क्लब पनवेल सनराईझचा शैक्षणिक मदतीचा हात
युवकांसाठी ‘व्हिजन भारत – जेन झी : संवाद ते संकल्प’ कार्यक्रम; भाजपा प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांची प्रमुख उपस्थिती

डॉक्टर श्री नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानने पनवेल पोलिसांना १०० बॅरिकेट्स देऊन दिला मदतीचा हात


पनवेल दि. ०१ 4k समाचार संजय कदम ( वार्ताहर ) : डॉक्टर श्री नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानने पनवेल पोलिसांना १०० बॅरिकेट्स देऊन मदतीचा हात दिला आहे. प्रतिष्ठानच्या या उपक्रमामुळे वाहतूक व्यवस्थापनात पोलिसांना मोठी मदत होणार आहे.


   दरवर्षी विविध सामाजिक उपक्रम राबवणाऱ्या डॉक्टर नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानने पनवेल पोलिसांना १०० बॅरिकेट्स दिले. उपयुक्त कार्यालयात झालेल्या या कार्यक्रमाला परीमंडळ ३ चे सहाय्यक पोलीस आयुक्त भाऊसाहेब ढोले यांच्यासह प्रतिष्ठानचे सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी भाऊसाहेब ढोले यांनी प्रतिष्ठानचे आभार मानले.

तसेच या बॅरिकेट्समुळे पनवेल शहरातील वाहतूक कोंडी नियंत्रणात आणण्यासाठी मोठी मदत होईल. शहरातील वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी पोलीस नेहमीच प्रयत्नशील असतात आणि अशा प्रकारच्या सामाजिक उपक्रमातून मिळणारी मदत पोलिसांचे काम अधिक सोपे करते असे सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back To Top