उरण दि ३१(विठ्ठल ममताबादे ) जाणीव सामाजिक सेवाभावी संस्था,उलवे यांच्या तर्फे जे.एम. म्हात्रे प्राथमिक शाळा व न्यू इंग्लिश स्कूल मोरा – उरण या शाळेतील पहिली ते दहावी पर्यंतच्या सर्व गरीब गरजू विद्यार्थ्यांना चालू शैक्षणिक वर्षी जाणीव सामाजिक सेवाभावी संस्थे मार्फत २५० विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वह्या, पेन्सिल, पेन पट्टी आदी शैक्षणिक साहित्यांचे वाटप करण्यात आले.जाणीव सामाजिक सेवाभावी संस्थेचे अध्यक्ष सुनील ठाकूर व पदाधिकारी दिनेश पाटील (बंधू), वटवृक्ष सामाजिक संस्थेचे अध्यक्ष किरण मढवी, नंदकुमार वाजेकर, अनिश पाटील, भानुदास वास्कर,चिंतामण पाटील,अंजू पाटील,रवींद्र भोईर यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच विनोद तारेकर व रोहिणी तारेकर यांच्या सहकार्याने विद्यार्थ्यांना मोफत शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आले.

प्राथमिक शाळेचे प्रभारी मुख्याध्यापक साईनाथ गावंड यांनी आपल्या प्रास्ताविका मध्ये काही भौतिक सुविधा कशा उपलब्ध करून घेतल्या या संदर्भात माहिती दिली. तसेच या शाळेमध्ये आज गरीब गरजू विद्यार्थी मोफत शिक्षण घेत आहेत.विद्यार्थ्यांची शैक्षणिक प्रगती व्हावी म्हणून वेगवेगळ्या प्रकारचे उपक्रम राबवले जातात.त्यापैकीच एक उपक्रम म्हणजे शैक्षणिक साहित्याचा वाटप हे वाटप जाणीव सामाजिक सेवाभावी संस्थेने केल्यामुळे त्यांचे शाळेच्या वतीने आभार मानतो असे मनोगत साईनाथ गावंड यांनी व्यक्त केले .माध्यमिक शाळेचे मुख्याध्यापक सुधीर मुंबईकर यांनी आपल्या मनोगतातून जाणीव सामाजिक सेवाभावी संस्था उलवेच्या कार्याबद्दल माहिती सांगितली तसेच शालेय भौतिक सुविधांबद्दल माहिती दिली. शैक्षणिक साहित्य देणाऱ्या संस्थेचे आभार व्यक्त केले.

दिनेश पाटील यांनी आपल्या मनोगतामधून जाणीव सामाजिक सेवाभावी संस्था, उलवे राबवत असलेल्या उपक्रमाबद्दल माहिती दिली. तसेच विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना सांगितले की शिक्षण घेत असताना विद्यार्थ्यांनी आपली दिशा निश्चित करणे गरजेचे आहे. तसेच आपण जन्मताच गरीब असलो तरी शिक्षण घेऊन आपण मोठे व्हायचं आहे आणि समाजामध्ये नाव कमवायचा आहे हीच आपलं श्रीमंती. शिक्षणासाठी जी काही मदत लागेल ते आम्ही करायला तयार आहोत असा शब्द दिला. कार्यक्रमाचे अध्यक्ष मनोज ठाकूर वनवासी कल्याण आश्रम उरण यांनी देखील विद्यार्थ्यांना मार्गदर्शनपर भाषण करून काही विद्यार्थ्यांना जर शिक्षणात अडचणी येत असतील तर त्या दूर करू व त्यांना पुढील उच्च शिक्षण चांगल्या प्रतीचे देऊ असे शब्द दिले.

या प्रसंगी जाणीव सामाजिक सेवाभावी संस्थेचे अध्यक्ष सुनील ठाकूर, दिनेश पाटील तसेच सर्व पदाधिकारी,माध्यमिक शाळेचे चेअरमन पी. एम. कोळी, प्राथमिक शाळेचे चेअरमन चंद्रकांत कोळी,माध्यमिकचे मुख्याध्यापक सुधीर मुंबईकर, प्रभारी मुख्याध्यापक साईनाथ गावंड, सहाय्यक शिक्षक सुगिंद्र म्हात्रे,अनिल पाटील, मनोज म्हात्रे, स्वप्निल नागमोती,रोहिणी घरत, सुनीता पाटील,राणी कदम, सुप्रिया मुंबईकर, सत्यवान मर्चंडे, रुपाली चौधरी, कोल्हे मॅडम, शिक्षक,
विद्यार्थी व पालक वर्ग उपस्थित होते. कार्यक्रमाची सजावट घनश्याम म्हात्रे,दिनेश पाटील व ममता गवस यांनी केली.सूत्रसंचालन अनिल पाटील यांनी केले. सहाय्यक शिक्षिका रोहिणी घरत यांनी आभार व्यक्त करून कार्यक्रम संपल्याचे जाहीर केले.
