नवीन बातम्या
GJS 2026 दिवाळी आवृत्तीचे उदय सामंत यांच्या हस्ते उद्घाटन
SCI भारताच्या सागरी महत्त्वाकांक्षेचा आधारस्तंभ : सोनोवाल
*बनावट नंबर प्लेट चा वापर करून विनयभंग व अपघात करणारा थार चालक यास अवघ्या 10 तासात ताब्यात घेतलेबाबत*
पनवेलच्या सांगुर्ली जिल्हा परिषद शाळेची यशोगाथा राष्ट्रीय पोर्टलवर‌.मुख्याध्यापिका मानसी भोसले यांच्या लेखणीतून उलगडला शैक्षणिक परिवर्तनाचा प्रेरणादायी प्रवास
पनवेलमध्ये त्वचा, केस, लेझर व एस्थेटिक केअरसाठी अत्याधुनिक ‘Skinourish’चे उद्घाटन
पनवेलच्या गुलाब बागवानची दिल्लीपर्यंत भरारी
नित्याज जेम्स अँड ज्वेलरीचा आयपीओ ३० सप्टेंबरला खुला
सज्ज आहेत माझे हात : अपोलो हॉस्पिटल्सच्या सीपीआर मोहिमेची विश्वविक्रम नोंद 30 दिवसांत 61,221 नागरिकांनी घेतली सीपीआर शिकण्याची शपथ
CREDAI MCHI YOUTH NMR कडून नवी मुंबई व रायगडमध्ये ‘Ease of Doing Redevelopment (EODR) 2.0’ची घोषणा

सिंधुदुर्ग जिल्हा रहिवासी हितवर्धक संस्था, पनवेलच्या वतीने वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात संपन्न


पनवेल, दि.9 (वार्ताहर) ः सिंधुदुर्ग जिल्हा रहिवासी हितवर्धक संस्था, पनवेल या आपल्या संस्थेचे वार्षिक स्नेहसंमेलन पनवेल येथील फडके नाट्यगृहात अत्यंत उत्साहात संपन्न झाले. कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ. भगवान बिरमोळे हे समारंभाचे अध्यक्ष या नात्याने आणि  शेकाप नेते प्रीतम म्हात्रे, शेकाप जिल्हा चिटणिस गणेश कडू, उद्योजक मंगेश परुळेकर, सिंधुदुर्ग येथील अभियंता अजयकुमार सर्वगौड, युवा नेते मंगेश अपराज, आदी मान्यवर प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.


याप्रसंगी रमाकांत चव्हाण व संजय साटम याना ’जीवन गौरव’ आणि पत्रकार संजय कदम याना ’सिंधुरत्न’ या पुरस्कारांनी गौरविण्यात आले. त्याचबरोबर यशस्वी युवा उद्योजक स्थापत्य अभियंता संतोष पोकळे, डॉ.तन्वी बांदेकर, डॉ. आशिष बांदेकर, ऍड. अमोल गावडे आणि क्रीडा क्षेत्रात यश प्राप्त केलेल्या खेळाडूंचाही सत्कार करण्यात आला. सचीव बाप्पा मोचेमाडकर यांनी प्रास्ताविकामधे वर्षभरात आपल्या संस्थेने राबवलेले उपक्रम आणि प्रगतीचा आढावा घेतला. नंतर उपाध्यक्ष प्रिया खोबरेकर व अध्यक्ष केशव राणे यांनी आपले मनोगत व्यक्त केल्यानंतर शेकाप नेते प्रीतम म्हात्रे यांनी आपल्या संस्थेला येणार्‍या कोणत्याही अडचणीमधे पूर्णपणे सहकार्य करण्याचे वचन दिले. नंतर अध्यक्ष डॉ. भगवान बिरमोळे यांनी आपल्या बालपणीची आठवण सांगून उपस्थितांसमोर आपले सकारात्मक आदर्श विचार मांडले.  उपाध्यक्ष संतोष चव्हाण यांनी आभार मानले.

 कार्यक्रमाचा प्रारंभ श्रीगणेश पंचरत्न या स्तोत्राच्या पार्श्‍वगायनाच्या साथीने दीपप्रज्वलन करून झाला. नंतर चेतनाताई वालावलकर व सहकारी महिलांनी नांदी व स्वागतगीत सादर केले.  माधव भागवत यांने तबला तर संकेत पवार यांने पखावज साथ केली. यशवंत बिड्ये बुवा यानी खंजिरीसाथ केली.  आपले सभासद व पाल्यांचे विविध गुणदर्शनपर सांस्कृतिक कार्यक्रम संपन्न झाले. यामधे नव्या जुन्या, मराठी-हिन्दी गाण्यांचे करावकेवर सादरीकरण, तसेच बासरीवादन, भरतनाट्यम विविध प्रकाचे नृत्य कलाकारांनी सादर केले. ज्येष्ठ महिलांनी सादर केलेले ’बाईपण भारी देवा’ हे फ्यूजन प्रकारातील समूहनृत्य रसिक प्रेक्षकांच्या मनाला चांगलेच भावले. या गाण्यांची निवड, त्याचे दिग्दर्शन आणि ज्येष्ठ महिलांकडून कसदार तालमीने करून घेतलेला पदविन्यास या त्रिगुणी संगमासाठी  नृत्यदिग्दर्शिका अदिती इंदप हिचे नक्कीच कौतुक करावे लागेल!  उपाध्यक्ष प्रिया खोबरेकर व सहकारी महिलांनी सादर केलेल्या ’कोकणचो रुबाब भारी’ या मालवणी नाटकाला रसिकांनीही मनमुराद दाद दिली.  प्रसन्नकुमार घागरे यांच्या संकल्पना व दिग्दर्शनाने नटलेला भव्यदिव्य वारकरी दिण्डीसोहळा कार्यक्रमाचा खास आकर्षणबिंदू ठरला.

आणि या कार्यक्रमाने सोहळा रंगततेच्या सर्वोच्चपदावर गेल्यानंतर राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता झाली.  वैभवी मराळ यांचे अभ्यासपूर्ण बहारदार निवेदन, गायकांचे भावपूर्ण गायन, नृत्यांगनांचा पदविन्यास आणि संघाची कार्यकारिणी व कार्यकर्त्यानी हा सोहळा यशस्वी करण्यासाठी दिलेले मोलाचे योगदान या चतुःसूत्रीच्या बळावर नटलेल्या या सोहळ्याच्या  सुखद स्मृती मनामधे साठवून नंतर रसिकांनी ’सात्विक’ आणि ’उन्मत्त’ अशा भोजनाचा आस्वाद घेतला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back To Top