पनवेल (प्रतिनिधी) प्रदीप भगत युवा मंच प्रभाग ११ यांच्या विद्यमाने रविवार दिनांक १६ फेब्रुवारी रोजी सकाळी ८ ते रात्री १० वाजेपर्यंत कामोठे येथे सोसायटी प्रीमिअर लीग बॉक्स क्रिकेट सामन्यांचे आयोजन करण्यात आले आहे.

सेक्टर २२ मधील छत्रपती शिवाजी महाराज उद्यान येथे होणाऱ्या या स्पर्धेतील विजेत्या संघाला १० हजार रुपये व चषक तर उपविजेत्या संघाला ५ हजार रुपये व चषक देऊन सन्मानित करण्यात येणार आहे.

आदिक माहितीसाठी सचिन यमगर ९७६८५८७१३१, सुयोग्य वाफारे ९३७२१७५३३६, शैलेश परबळकर ९९३०३०७८४९ किंवा नयन चौगुले ९०८२०७६४०७ या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन माजी नगरसेविका अरुणा भगत, संजसेवक प्रदीप भगत यांनी केले आहे.
