नवीन बातम्या
आदित्य यशवंत घरत यांची उरण तालुका काँग्रेसच्या उपाध्यक्षपदी निवड
एस. एस. पाटील इंटरनॅशनल स्कूलमध्ये फायर अवेअरनेस प्रोग्राम आगीच्या दुर्घटनेपासून बचावासाठी विद्यार्थ्यांना अग्निशमन विभागाचे प्रशिक्षण
उरणच्या प्रकल्पग्रस्तांना मोठा दिलासा २५६ कुटुंबांची यादी अंतिम करण्याचे उच्च न्यायालयाचे निर्देश; ४० वर्षांच्या संघर्षाला निर्णायक दिशा
शैक्षणिक नवोपक्रमांची राज्यस्तरावर दखल
शर्मिला महेंद्र गावंड यांना ‘शिवभूमी आदर्श शिक्षक पुरस्कार’
गणपती बाप्पाच्या विसर्जनासाठी माणुसकीचा पुढाकार!
वैभव कडू यांचा स्वखर्चातून समुद्रकिनारी विसर्जन मार्ग मोकळा
How to Accept Deposits and Partial Payments in WordPress (No WooCommerce)
Open Channels FM: Introducing Open Source Champions
शेकाप व एकता असोसिएशनतर्फे आयुष्मान भारत, आभा कार्ड नोंदणी शिबिर २५० नागरिकांनी घेतला लाभ
महिला संघटन मजबूत करण्यावर निधी शिंदे यांचे मार्गदर्शन

देहरंग धरण उंची वाढवण्याच्या नियोजित प्रकल्पाला आर्थिक पाठबळ द्या – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे आमदार प्रशांत ठाकूर यांची मागणी

पनवेल (प्रतिनिधी) पनवेल महानगरपालिका क्षेत्रात पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करणाऱ्या गाढी नदीवरील देहरंग धरणाची उंची वाढविण्याच्या नियोजित प्रकल्पास आर्थिक पाठबळ देण्याची मागणी आमदार प्रशांत ठाकूर यांनी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे.


  या संदर्भात आमदार प्रशांत ठाकूर यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिलेल्या निवेदनात म्हंटले आहे कि, पनवेल महानगरपालिकेची स्थापना ०१ ऑक्टोबर २०१६ रोजी झाली असून, मुंबई, नवी मुंबई शहरालगत असल्यामुळे तसेच विमानतळ व परिसरातील औद्योगिकरण यामुळे महानगरपालिका क्षेत्राची लोकसंख्या झपाटयाने वाढत आहे. महानगरपालिका क्षेत्राची प्रती माणसी १५० लीटर या मापकाप्रमाणे दैनंदिन स्थुल गरज ३९४ दश लक्ष लिटर असून २०५७ पर्यंत ८४७ दश लक्ष लिटर असणार आहे.

सद्यस्थितीत महानगरपालिका क्षेत्रास देहरंग धरण, महाराष्ट्र जीवन प्राधिकरण, सिडको, नवी मुंबई महानगरपालिका (मोर्बे धरण) व एमआयडीसी यांच्याकडून सुमारे २२४  दश लक्ष लिटर पाणी पुरवठा होतो. तथापि वाढती लोकसंख्या विचारात घेता भविष्यात त्यामध्ये फार मोठी तुट येण्याची शक्यता आहे. ही तुट भरून काढण्यासाठी दुर्देवाने पनवेल महापालिकेकडे स्वतःच्या मालकीच्या देहरंग धरणाची उंची वाढवण्याच्या पर्यायाशिवाय अन्य पर्याय दृष्टीपथात नाही, असेही आमदार प्रशांत ठाकूर यांनी या निवेदनात अधोरेखित केले.


महानगरपालिकेच्या मालकीच्या देहरंग धरणाची पूर्ण संचय पातळी वाढविल्याने पाणी संचयात मोठी वाढ होऊन त्याच्या वापर सुलभरीत्या व कायमस्वरूपी उपाययोजना म्हणून होणार आहे. देहरंग धरणाची उंची वाढविणे संदर्भात व त्यासाठी करावयाच्या आर्थिक तरतुदीसंदर्भात आयुक्त-पनवेल महानगरपालिकेने आपल्याकडे ०९ जानेवारी २०२५ रोजी एक प्रस्तावही सादर केला आहे. त्या अनुषंगाने देहरंग धरणाची पूर्ण संचय पातळी २० मीटरने वाढविणे व त्यासाठी २९४ हेक्टर जमीन संपादन करण्यासाठी सुमारे ९०० कोटी रूपयांचा खर्च अपेक्षित आहे. मात्र नव्याने स्थापन झालेल्या महापालिकेची आर्थिक स्थिती विचारात घेता राज्य सरकारने त्यासाठी निधी उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी आमदार प्रशांत ठाकूर यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back To Top