नवीन बातम्या
आदित्य यशवंत घरत यांची उरण तालुका काँग्रेसच्या उपाध्यक्षपदी निवड
एस. एस. पाटील इंटरनॅशनल स्कूलमध्ये फायर अवेअरनेस प्रोग्राम आगीच्या दुर्घटनेपासून बचावासाठी विद्यार्थ्यांना अग्निशमन विभागाचे प्रशिक्षण
उरणच्या प्रकल्पग्रस्तांना मोठा दिलासा २५६ कुटुंबांची यादी अंतिम करण्याचे उच्च न्यायालयाचे निर्देश; ४० वर्षांच्या संघर्षाला निर्णायक दिशा
शैक्षणिक नवोपक्रमांची राज्यस्तरावर दखल
शर्मिला महेंद्र गावंड यांना ‘शिवभूमी आदर्श शिक्षक पुरस्कार’
गणपती बाप्पाच्या विसर्जनासाठी माणुसकीचा पुढाकार!
वैभव कडू यांचा स्वखर्चातून समुद्रकिनारी विसर्जन मार्ग मोकळा
शेकाप व एकता असोसिएशनतर्फे आयुष्मान भारत, आभा कार्ड नोंदणी शिबिर २५० नागरिकांनी घेतला लाभ
महिला संघटन मजबूत करण्यावर निधी शिंदे यांचे मार्गदर्शन
गणेशोत्सवात वाहतुकीचे नियोजन; अतिक्रमण हटविण्यासाठी वाहतूक पोलिस रस्त्यावर पनवेल बाजारपेठेत कोंडी टाळण्यासाठी निर्बंध; ७० कर्मचारी, सात अधिकारी तैनात
श्रावणाच्या साजाला फॅशनचा तडका
‘द रॉयल-श्रावण व्होग’मध्ये कलागुणांचा जल्लोष

गणपती बाप्पाच्या विसर्जनासाठी माणुसकीचा पुढाकार!
वैभव कडू यांचा स्वखर्चातून समुद्रकिनारी विसर्जन मार्ग मोकळा


4kNews
उरण, दि.  15 (विठ्ठल ममताबादे) : गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर नागांव तसेच परिसरातील भाविक मोठ्या संख्येने पिरवाड समुद्रकिनारी गणपती विसर्जनासाठी येतात. मात्र, समुद्राच्या लाटांमुळे किनाऱ्यावर मोठ्या प्रमाणात दगड जमा झाल्याने विसर्जन मार्गावर अडथळा निर्माण झाला होता. 



ही अडचण लक्षात घेऊन नागांव-म्हातवली प्रकल्पग्रस्त अध्यक्ष तथा समाजसेवक वैभव यशवंत कडू यांच्याकडे नागरिकांनी मार्ग मोकळा करण्याची मागणी केली. नागरिकांची अडचण लक्षात घेत कडू यांनी कोणाचीही वाट न पाहता स्वखर्चातून समुद्रकिनारी जाणारा विसर्जन मार्ग मोकळा करून दिला.



‘गावकऱ्यांची अडचण ही आपलीच अडचण’ या भावनेतून केलेल्या या उपक्रमामुळे गणेशभक्तांना मोठा दिलासा मिळाला आहे. कोणत्याही प्रसिद्धीची अपेक्षा न ठेवता केलेल्या या सामाजिक उपक्रमाचे नागांव व परिसरातील नागरिकांकडून कौतुक होत असून, वैभव कडू यांचे आभार व्यक्त करण्यात येत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back To Top