नवीन बातम्या
पनवेलमध्ये भाजपची सिंधुदुर्ग, रत्नागिरी आणि रायगड जिल्ह्यांची संघटनात्मक बैठक संपन्न! ; प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली आगामी पक्षकार्याचा आढावा; संघटनात्मक बळकटीकरणावर भर
डबल महाराष्ट्र केसरी पैलवान चंद्रहार पाटील यांच्यासह मान्यवरांकडून भाजपचे प्रदेश चिटणीस आमदार प्रशांत ठाकूर यांची सदिच्छा भेट!
विहिरी-बोअरवेलचे सर्वेक्षण, भूजल पुनर्भरण आणि प्रभागनिहाय जलसुरक्षा आराखडा तयार करण्यासाठी राजेंद्र शर्मा यांचे महापौर आणि आयुक्तांना निवेदन
हायकल कंपनीतील कामगारांना दरमहा २० हजारांची पगारवाढ; जय भारतीय जनरल कामगार संघटनेच्या करारामुळे विविध सुविधांचा लाभ!
पनवेलमध्ये स्वर्णमेघ ज्वेलर्सचा शुभारंभ; नगरसेवक परेश ठाकूर यांच्या हस्ते उद्घाटन!
ए-टाईप परिसरात दूषित पाण्याचा प्रश्न ऐरणीवर; जलवाहिनी सर्वेक्षणाची मागणी पाण्याचे प्रयोगशाळेत परीक्षण करून अहवाल सादर करण्याची नगरसेविका अस्मिता घरत यांची मागणी
शेल इंडिया कंपनीतील कामगारांना दरमहा १३ हजारांची पगारवाढ! जय भारतीय जनरल कामगार संघटनेच्या यशस्वी प्रयत्नांना मोठे यश; वैद्यकीय विमा, बोनससह विविध सुविधांचा लाभ
मास्टर मरीन मेहर यार्ड कंपनीविरोधातील गेट बंद आंदोलन स्थगित  १९ स्थानिक प्रकल्पग्रस्तांना रोजगार देण्याचे कंपनी प्रशासनाचे आश्वासन; अजित म्हात्रे यांच्या नेतृत्वाखालील आंदोलनाला यश
मास्टर मरीन मेहेर यार्ड -खोपटे कंपनीविरोधात गेट बंद आंदोलन !

डबल महाराष्ट्र केसरी पैलवान चंद्रहार पाटील यांच्यासह मान्यवरांकडून भाजपचे प्रदेश चिटणीस आमदार प्रशांत ठाकूर यांची सदिच्छा भेट!

4kNews कामोठे दि. 31

पनवेल (प्रतिनिधी)  डबल महाराष्ट्र केसरी व शिवसेना क्रीडा सेना प्रमुख पैलवान चंद्रहार पाटील, हिंदकेसरी पैलवान संतोष आबा वेताळ तसेच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या माथाडी कामगार सेनेचे राज्य चिटणीस लक्ष्मणदादा गायकवाड यांनी भाजपचे महाराष्ट्र प्रदेश चिटणीस आमदार प्रशांत ठाकूर यांची आज पनवेल येथे सदिच्छा भेट घेतली.



या भेटीदरम्यान विविध विषयांवर चर्चा करण्यात आली. क्रीडा क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या पैलवानांच्या उपस्थितीमुळे या भेटीला विशेष महत्त्व प्राप्त झाले. कुस्तीच्या क्षेत्रात आपल्या कर्तृत्वाचा ठसा उमटविणाऱ्या मान्यवरांनी आमदार प्रशांत ठाकूर यांची भेट घेत सदिच्छापूर्ण संवाद साधला. यावेळी आमदार प्रशांत ठाकूर यांनी या पैलवानांचे स्वागत केले. तसेच पैलवानांनी आमदार प्रशांत ठाकूर यांचा सत्कार केला. यावेळी कामोठे मंडल सरचिटणीस हर्षवर्धन पाटील, मंडल उपाध्यक्ष उत्तम नाना जरग आदी मान्यवर उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back To Top