नवीन बातम्या
आदिवासी बांधवांसोबत गणेशोत्सवाचा आनंद; महिला, पुरुष व चिमुकल्यांचा सन्मान
महापौर निवासस्थानी चाफेवाडी, फणसवाडीतील नागरिकांच्या हस्ते गणरायाची आरती; क्रिकेट संघांना क्रीडा साहित्याकरिता आर्थिक मदत
How to Build a WooCommerce Print Shop Order Form With File Upload
OpenStation Blog: A better way to use WordPress
Open Channels FM: OCN Week in Review #4
Open Channels FM: Drawing the Line Between Openness and Noise in the Digital World
५२ महाविद्यालयांचा सहभाग; सी.के.टी. महाविद्यालयात आंतरमहाविद्यालयीन फुटबॉल स्पर्धेला सुरुवात
एईआरए दर सवलतींमुळे नवी मुंबई विमानतळावरून आंतरराष्ट्रीय प्रवास अधिक स्वस्त होणार
पर्यावरण संवर्धनाचा संदेश देत ‘ग्रीन गणेशा’ उपक्रमाला सुरुवात; संचालक सोमनाथ मलगर यांचे विशेष पुढाकार आणि मार्गदर्शन
ठाकूर कुटुंबीयांच्या शिवाजीनगर येथील निवासस्थानी बाप्पाची भक्तिमय वातावरणात प्रतिष्ठापना

पनवेल पदाधिकारी राहुल गोगटे यांच्या प्रयत्नाने वैद्यकीय मदत कक्षातून रुग्णास मिळाली ५८ हजारांची बिलातून सूट

4kNews कामोठे दि. 2

पनवेल / प्रतिनिधी : -संजय कदम
पनवेल तालुक्यातील जाताडे या गावी राहणारा श्लोक किशोर म्हात्रे या सहा वर्षाय मुलगा घरात खेळताना पडला असता त्याच्या मेंदूला गंभीर दुखापत झाली. मुलाच्या वडिलांची आर्थिक परिस्थिती ठीक नसताना देखील त्यांनी नवी मुंबई बेलापूर अपोलो हॉस्पिटल येथे उपचारासाठी ठेवले.अशा परिस्थिती मुलाचे वडील किशोर म्हात्रे यांनी शिवसेना पनवेल उपमहानगर समन्वयक राहुल केशव गोगटे यांच्याशी संपर्क साधून बिलातून सूट मिळण्यासाठी सहकार्य करण्याचे सांगितले. 



राहुल गोगटे यांनी या अगोदर देखील अनेकांना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वैद्यकीय मदत कक्षाद्वारे मदत मिळवून दिली आहे. यावेळी देखील त्यांनी वैद्यकीय मदत कक्षाचे प्रमुख मंगेश चिवटे तसेच नितेश सर यांच्याशी संपर्क साधून अपोलो हॉस्पिटल मध्ये उपचार घेत असलेल्या मुलास ५८ हजार रुपयांची मदत मिळवून देत किशोर म्हात्रे यांना मदतीचा हात दिला आहे. 



अपोलो हॉस्पिटलमध्ये असताना श्लोक याचे अत्यंत कठीण परिस्थिती त्याचे ऑपरेशन करण्यात आले. श्लोक आता बरा असून पनवेल येथील मोहिते हॉस्पिटल येथे पुढील उपचार घेत आहे.
शिवसेनेच्या माध्यमातून झालेल्या या मदतीबद्दल किशोर म्हात्रे यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, वैद्यकीय कक्ष प्रमुख मंगेश चिवटे, नितेश सर व शिवसेना पनवेल उपमहानगर समन्वयक राहुल गोगटे यांचे आभार मानले आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back To Top