नवीन बातम्या
पनवेलमध्ये भाजपची सिंधुदुर्ग, रत्नागिरी आणि रायगड जिल्ह्यांची संघटनात्मक बैठक संपन्न! ; प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली आगामी पक्षकार्याचा आढावा; संघटनात्मक बळकटीकरणावर भर
डबल महाराष्ट्र केसरी पैलवान चंद्रहार पाटील यांच्यासह मान्यवरांकडून भाजपचे प्रदेश चिटणीस आमदार प्रशांत ठाकूर यांची सदिच्छा भेट!
विहिरी-बोअरवेलचे सर्वेक्षण, भूजल पुनर्भरण आणि प्रभागनिहाय जलसुरक्षा आराखडा तयार करण्यासाठी राजेंद्र शर्मा यांचे महापौर आणि आयुक्तांना निवेदन
हायकल कंपनीतील कामगारांना दरमहा २० हजारांची पगारवाढ; जय भारतीय जनरल कामगार संघटनेच्या करारामुळे विविध सुविधांचा लाभ!
पनवेलमध्ये स्वर्णमेघ ज्वेलर्सचा शुभारंभ; नगरसेवक परेश ठाकूर यांच्या हस्ते उद्घाटन!
ए-टाईप परिसरात दूषित पाण्याचा प्रश्न ऐरणीवर; जलवाहिनी सर्वेक्षणाची मागणी पाण्याचे प्रयोगशाळेत परीक्षण करून अहवाल सादर करण्याची नगरसेविका अस्मिता घरत यांची मागणी
शेल इंडिया कंपनीतील कामगारांना दरमहा १३ हजारांची पगारवाढ! जय भारतीय जनरल कामगार संघटनेच्या यशस्वी प्रयत्नांना मोठे यश; वैद्यकीय विमा, बोनससह विविध सुविधांचा लाभ
मास्टर मरीन मेहर यार्ड कंपनीविरोधातील गेट बंद आंदोलन स्थगित  १९ स्थानिक प्रकल्पग्रस्तांना रोजगार देण्याचे कंपनी प्रशासनाचे आश्वासन; अजित म्हात्रे यांच्या नेतृत्वाखालील आंदोलनाला यश
मास्टर मरीन मेहेर यार्ड -खोपटे कंपनीविरोधात गेट बंद आंदोलन !

हायकल कंपनीतील कामगारांना दरमहा २० हजारांची पगारवाढ; जय भारतीय जनरल कामगार संघटनेच्या करारामुळे विविध सुविधांचा लाभ!

4kNews कामोठे दि. 31

पनवेल (प्रतिनिधी) भाजपचे महाराष्ट्र प्रदेश चिटणीस आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली आणि कामगार नेते जितेंद्र घरत यांच्या नेतृत्वाखाली कार्यरत असलेल्या जय भारतीय जनरल कामगार संघटनेच्या माध्यमातून तळोजा औद्योगिक क्षेत्रातील हायकल लिमिटेड कंपनीमधील कामगारांसाठी महत्त्वपूर्ण करार करण्यात आला आहे. या पाच वर्षांच्या करारानुसार कामगारांना दरमहा तब्बल २० हजार रुपयांची पगारवाढ मिळणार असून, त्यासोबतच वैद्यकीय विमा, बिनव्याजी कर्ज, सणासाठी आगाऊ रक्कम, बोनसवाढ आणि निवृत्तीनंतरही वैद्यकीय सुविधांसह विविध लाभ मिळणार आहेत. या करारामुळे कामगारांच्या आर्थिक स्थैर्याला बळ मिळण्याबरोबरच त्यांच्या सामाजिक आणि कौटुंबिक सुरक्षिततेलाही हातभार लागणार आहे.



या करारानुसार कामगारांना अडीच लाख रुपयांची मेडिक्लेम पॉलिसी, तीन लाख रुपयांपर्यंतचे बिनव्याजी कर्ज, गणपती सणासाठी ३० हजार रुपये आगाऊ रक्कम आणि पिकनिकसाठी आठ हजार रुपये भत्ता देण्यात येणार आहे. यंदा कामगारांना ४७ हजार रुपये बोनस मिळणार असून, पुढील चार वर्षांत बोनसच्या रकमेत दरवर्षी दोन हजार रुपयांची वाढ करण्यात येणार आहे. कामगारांच्या भविष्यातील सुरक्षिततेचा विचार करून या करारात निवृत्तीनंतर वयाच्या ६५ वर्षांपर्यंत वैद्यकीय सुविधा उपलब्ध करून देण्याची तरतूद करण्यात आली आहे. 

तसेच, निवृत्तीपर्यंत २०० दिवसांच्या पगारी रजेची (पीएल) साठवणूक करण्याची सुविधा आणि ३० हजार रुपयांपर्यंत तातडीचे कर्ज उपलब्ध करून देण्याचाही समावेश आहे.कामगारांच्या वेतनवाढीबरोबरच आरोग्य, आर्थिक गरजा, सण-उत्सव आणि निवृत्तीनंतरचे जीवन यांचा विचार करून हा करार करण्यात आला आहे. कामगारांच्या न्याय्य हक्कांसाठी आणि त्यांच्या जीवनमानात सुधारणा घडवून आणण्यासाठी जय भारतीय जनरल कामगार संघटना सातत्याने प्रयत्नशील असल्याचे या करारातून अधोरेखित झाले आहे.  पनवेल येथे झालेल्या या करारावेळी जय भारतीय जनरल कामगार संघटनेचे अध्यक्ष जितेंद्र घरत, हायकल कंपनीचे एजीएम व एचआर हेड विशाल पाटील, मॅनेजर देवेंद्र पालेकर, हायकल युनिटचे अध्यक्ष प्रशांत कदम, उपाध्यक्ष राजेश साळवी, सदस्य सतीश घरत, संतोष शिर्के आणि खजिनदार नथुराम म्हात्रे यांच्यासह संबंधित पदाधिकारी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back To Top