नवीन बातम्या
पनवेलमध्ये भाजपची सिंधुदुर्ग, रत्नागिरी आणि रायगड जिल्ह्यांची संघटनात्मक बैठक संपन्न! ; प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली आगामी पक्षकार्याचा आढावा; संघटनात्मक बळकटीकरणावर भर
डबल महाराष्ट्र केसरी पैलवान चंद्रहार पाटील यांच्यासह मान्यवरांकडून भाजपचे प्रदेश चिटणीस आमदार प्रशांत ठाकूर यांची सदिच्छा भेट!
विहिरी-बोअरवेलचे सर्वेक्षण, भूजल पुनर्भरण आणि प्रभागनिहाय जलसुरक्षा आराखडा तयार करण्यासाठी राजेंद्र शर्मा यांचे महापौर आणि आयुक्तांना निवेदन
हायकल कंपनीतील कामगारांना दरमहा २० हजारांची पगारवाढ; जय भारतीय जनरल कामगार संघटनेच्या करारामुळे विविध सुविधांचा लाभ!
पनवेलमध्ये स्वर्णमेघ ज्वेलर्सचा शुभारंभ; नगरसेवक परेश ठाकूर यांच्या हस्ते उद्घाटन!
ए-टाईप परिसरात दूषित पाण्याचा प्रश्न ऐरणीवर; जलवाहिनी सर्वेक्षणाची मागणी पाण्याचे प्रयोगशाळेत परीक्षण करून अहवाल सादर करण्याची नगरसेविका अस्मिता घरत यांची मागणी
शेल इंडिया कंपनीतील कामगारांना दरमहा १३ हजारांची पगारवाढ! जय भारतीय जनरल कामगार संघटनेच्या यशस्वी प्रयत्नांना मोठे यश; वैद्यकीय विमा, बोनससह विविध सुविधांचा लाभ
मास्टर मरीन मेहर यार्ड कंपनीविरोधातील गेट बंद आंदोलन स्थगित  १९ स्थानिक प्रकल्पग्रस्तांना रोजगार देण्याचे कंपनी प्रशासनाचे आश्वासन; अजित म्हात्रे यांच्या नेतृत्वाखालील आंदोलनाला यश
मास्टर मरीन मेहेर यार्ड -खोपटे कंपनीविरोधात गेट बंद आंदोलन !

पनवेलमध्ये स्वर्णमेघ ज्वेलर्सचा शुभारंभ; नगरसेवक परेश ठाकूर यांच्या हस्ते उद्घाटन!

4kNews कामोठे दि. 31
पनवेलमध्ये स्वर्णमेघ ज्वेलर्सचा शुभारंभ; नगरसेवक परेश ठाकूर यांच्या हस्ते उद्घाटन!
पनवेल (प्रतिनिधी) शहरातील झवेरी बाजार परिसरातील जोशी आळी येथील पवन अपार्टमेंटमधील शॉप क्रमांक ५ येथे नव्याने सुरू करण्यात आलेल्या स्वर्णमेघ ज्वेलर्स या सुवर्णपेढीचे उद्घाटन पनवेल महानगरपालिकेचे नगरसेवक तथा माजी सभागृहनेते परेश ठाकूर यांच्या हस्ते उत्साहात संपन्न झाले. मराठी उद्योजकांनी सुरू केलेल्या या व्यवसायाच्या माध्यमातून स्थानिक व्यावसायिक क्षेत्रात आणखी एक नवा उपक्रम सुरू झाला आहे.



भगवान पावणे आणि जगन्नाथ (राजू) पावणे हे २००९ पासून ज्वेलर्स व्यवसायात कार्यरत असून, आपल्या अनुभवाच्या जोरावर त्यांनी स्वर्णमेघ ज्वेलर्सच्या माध्यमातून व्यवसायाचा विस्तार करण्याच्या दिशेने पाऊल टाकले आहे. यावेळी नगरसेवक परेश ठाकूर यांनी स्वर्णमेघ ज्वेलर्सचे उद्घाटन करून भगवान पावणे आणि जगन्नाथ (राजू) पावणे यांना नवीन व्यवसायासाठी शुभेच्छा दिल्या. तसेच, त्यांच्या व्यवसायाची भरभराट होऊन भविष्यात स्वर्णमेघ ज्वेलर्सच्या आणखी शाखा सुरू व्हाव्यात आणि त्यांनी यशाची नवनवीन शिखरे गाठावीत, अशा सदिच्छा व्यक्त केल्या.



या उद्घाटन सोहळ्याला मोतीलाल जैन, संजय जैन, कामोठे पोलीस ठाण्याचे दामोदर पावणे, बाबाजी पावणे, सुरवंता पावणे, जयवंत पावणे, शांताबाई पावणे, वसंत गोरड, मेघा पावणे, माया पावणे, चंद्रभान सिंग रावत, वसंत पावणे, अनिल इरकर, पोलीस उपनिरीक्षक बाळू बंडगर, अरुण यमगर, आबा सरगर, पांडुरंग यमगर, अंकुश पोकळे, नामदेव थोरात, विशाल बोबडे, माधव चव्हाण, प्रकाश घटूगडे, दीपक खरात यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back To Top