4k समाचार
पनवेल दि.25 (वार्ताहर) : कामोठे शहरातील नागरिकांना गेल्या तीन वर्षांपासून प्रतीक्षेत ठेवणारा पेट्रोल पंप लवकरच सुरू होणार आहे. कामोठे मंडळ भाजपा पदाधिकाऱ्यांनी सेक्टर १८ येथील पेट्रोल पंपाची पाहणी करून संबंधित समस्यांवर तोडगा काढण्यासाठी पुढाकार घेतला.

यावेळी मंडळ अध्यक्ष विकास घरत आणि समाजसेवक रवी गोवारी यांनी पेट्रोल पंपाच्या मालकाशी दूरध्वनीवर संवाद साधत अडथळ्यांची माहिती घेतली. या समस्यांवर उपाय म्हणून आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली सिडको, वन विभाग (CRZ) तसेच पनवेल महानगरपालिका यांच्यासोबत बैठक घेऊन आवश्यक कार्यवाही करण्यात येणार आहे. या सर्व चर्चेनंतर कामोठे मंडळ भाजपा पदाधिकाऱ्यांनी आश्वासन दिले की, लवकरच या विषयावर ठोस तोडगा निघेल आणि पेट्रोल पंप कामोठेकरांच्या सेवेत सुरू होईल.
