4k समाचार दि.
पनवेल दि.२६ (संजय कदम) : नवी मुंबई पोलीस आयुक्तालय हद्दीत मोठ्या प्रमाणावर लोकवस्ती आहे. तसेच कामानिमित्त आलेल्या नागरिकांचे प्रवासादरम्यान, खरेदीच्या वेळी व इतर कारणास्तव त्यांचेकडील वापरते मोबाईल फोन गहाळ झाल्याबाबत विविध पोलीस ठाण्यांकडे प्रॉपर्टी मिसिंग तक्रार दाखल होत आहेत. अशा गहाळ झालेल्या मोबाईल फोनमध्ये फोन धारकाचे, नातेवाईक, मित्र व परिचित इसमांचे संपर्क क्रमांक, फोटो, व्हिडीओ, मेसेज इत्यादी स्वरूपाने त्यात आठवणी जतन केलेल्या असल्याने मोबाईल गहाळ होणे हा संबंधीत मोबाईल धारकांसाठी भावनिक विषय देखील आहे.

गहाळ झालेल्या मोबाईल फोनचा शोध घेण्याकरीता शासन स्तरावर CEIR पोर्टल कार्यान्वीत करण्यात आलेले आहे. पोलीस आयुक्त मिलिंद भारंबे, पोलीस सह. आयुक्त संजय येनपुरे, अपर पोलीस आयुक्त (गुन्हे) दिपक साकोरे, पोलीस उप आयुक्त (गुन्हे) सचिन गुंजाळ यांनी CEIR पोर्टलचा प्रभावी वापर करून गहाळ झालेले मोबाईल फोन परत मिळविण्याचे अनुषंगाने कार्यवाही करण्याचे आदेशित केले होते. गुन्हे शाखा कक्ष ३, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, अविनाश काळदाते यांनी विशेष पथक स्थापन करुन समांतर शोध सुरु केला. पोहवा इंद्रजित कानु, गुन्हे शाखा कक्ष ३ यांनी CEIR पोर्टलवरुन प्राप्त माहितीचे तांत्रिक विश्लेषण करुन संबंधीत सिमकार्ड धारकांना फोन करून त्यांना विश्वासात घेवून मागील तीन महिन्यात महाराष्ट्र व परराज्यातुन शोधुन आणलेले २५ लाख रूपये किमतीचे विविध कंपन्यांचे एकुण १२२ मोबाईल फोन सहाय्यक पोलीस आयुक्त (गुन्हे शाखा) अजयकुमार लांडगे यांच्या हस्ते संबंधीत मोबाईल धारकांना आज परत केले आहेत.

सदर कामगिरीबाबत नागरिकांनी समाधान व्यक्त केले असुन भविष्यात ही पोलीसांनी अशीच चांगली कामगिरी करत राहावी असे मत व्यक्त केले आहे. सदरची उल्लेखनीय कामगिरी गुन्हे शाखा कक्ष ०३ पनवेलचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अविनाश काळदाते यांच्या नेतृत्वाखाली सपोनि पवन नांदे, पोउपनि अभयसिंह शिंदे, पोउपनि माधव इंगळे, सहाय्य्क फौजदार अनिल पाटील, पोहवा. रमेश शिंदे, प्रशांत काटकर, प्रमोद राजपुत, निलेश पाटील, दिपक डोंगरे, सागर रसाळ, इंद्रजित कानु, रुपेश पाटील, अजित पाटील, हिरकणी पाटील, पो.ना. आजिनाथ फुंदे, विनया पाटील, पो.शि. लवकुश शिंगाडे, विक्रांत माळी, प्रसाद घरत यांनी केलेली आहे.
