4k समाचार दि. 2
मुंबईतील आझाद मैदानावर मनोज जरांगे पाटील यांचे मराठा आरक्षणासाठी उपोषण आज पाचव्या दिवशी पोहोचले असून, त्यांच्या प्रमुख मागण्यांपैकी एकावर सरकारकडून हालचाली सुरु झाल्या आहेत. मराठा आंदोलक तरुणांवर दाखल झालेल्या गुन्ह्यांची मागे घेण्याची प्रक्रिया प्रत्यक्षात सुरु झाली आहे..

बीड जिल्ह्यात या संदर्भातील कार्यवाहीला सुरुवात झाल्याची माहिती समोर आली आहे. सरकारकडून आरक्षण आंदोलनातील गुन्हे एका महिन्यात मागे घेण्याचा निर्णय घेतल्याचे सांगण्यात येत आहे. विशेष म्हणजे, आंदोलकांवर दाखल झालेल्या सुमारे 400 प्रकरणांची तपासणी अद्याप झालेली नाही. आता ही तपासणी 20 दिवसांच्या आत पूर्ण करण्याचे नियोजन करण्यात आले आहे.
या घडामोडींमुळे मराठा आंदोलकांमध्ये समाधानाची भावना व्यक्त होत असली, तरी पुढील निर्णयांकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

मराठा तरुणांवरील गुन्हे मागे घेण्यास सुरुवात; बीडमध्ये कार्यवाहीचा शुभारंभ