4k समाचार
उरण दि 3 (विठ्ठल ममताबादे )लायन्स क्लब ऑफ उरण गोल्ड च्या वतीने सेवा सप्ताह आयोजीत केला जात आहे. त्या निमीत डिस्ट्रीक्ट चेअरमन लायन ऍड. दत्तात्रेय नवाळे यांचे तर्फे उरण तालुक्यातील विंधणे येथील अदिवासी बांधवांना ब्लॅकेटचे वाटप करण्यात आले.

सदरचे वेळी लायन्स क्लब ऑफ उरण गोल्ड च्या प्रेसिडेंट लायन श्रीमती निरज कार्डीयन तसेच एम.जे.एफ. लायन संदीप म्हात्रे, लायन निखील भोईर, लायन मच्छिंद्र घरत, लायन श्रेयस घरत, लायन राजेद्र ठाकुर, लायन रेखा घरत आदी मान्यवर उपस्थित होते.डीस्ट्रीक्ट चेअरमन लायन ऍड. दत्तात्रेय नवाळे हे सामाजिक कार्यात नेहमी अग्रेसर असतात. आजपर्यंत त्यांनी अनेक उपक्रम, कार्यक्रम राबविले आहेत.सामाजिक बांधिलकी जपत आयोजित केलेल्या या उपक्रमामुळे थंडीच्या दिवसात गोर गरिबांना मायेची, प्रेमाची उब मिळाली आहे.
