4k समाचार दि. 2
मनोज जरांगे यांच्या मागणीनुसार मराठा आंदोलकांवरील दाखल गुन्हे मागे घेण्याचे आश्वासन सरकारने दिल्यानंतर नवे वादंग उभे राहिले आहे. प्रसिद्ध विधिज्ञ अॅड. गुणरत्न सदावर्ते यांनी या निर्णयाला तीव्र आक्षेप नोंदवला आहे.

सदावर्ते यांनी स्पष्ट केले की, आंदोलनादरम्यान पोलिसांवर झालेल्या हल्ल्यांचे गुन्हे मागे घेणे कायद्याच्या चौकटीत शक्यच नाही. असे गुन्हे मागे घेण्याचा सरकारने प्रयत्न केला, तर ते थेट न्यायालयात धाव घेतील, असा इशारा त्यांनी दिला. यासोबतच संबंधित मंत्र्यांनाही प्रतिवादी म्हणून उभे करणार असल्याचे त्यांनी ठामपणे सांगितले.
सरकारकडून आंदोलकांना दिलेल्या आश्वासनानंतर आता सदावर्तेंच्या भूमिकेमुळे पुढील घडामोडींवर राज्याचे लक्ष केंद्रीत झाले आहे.
