4k समाचार दि. 2
आवाज महामुंबईचा चॅनेल चे संपादक तथा पत्रकार उत्कर्ष समिती महाराष्ट्र चे रायगड जिल्हाध्यक्ष श्री मिलिंद खारपाटील यांची आगरी सेना पत्रकार संघ उरण तालुकाप्रमुख पदी नियुक्ती आगरी सेना रायगड जिल्हा प्रमुख सचिन मते यांनी जाहीर केली.
मिलिंद खारपाटील हे गेली ३६ वर्ष अनेक वर्तमानपत्र आणि न्यूज चॅनेल मध्ये सक्रिय काम करीत आहेत.
श्रमजीवी मध्ये सहसंपादक, श्रमशक्ती मध्ये कार्यकारी संपादक, महामुंबई २४ बाय ७ मध्ये संपादक म्हणून त्यांनी काम केले आहे. रामप्रहर, कर्नाळा, किल्ले रायगड, आपले साम्राज्य, आवाज कोकणचा, पुण्यनगरी, कृषीवल, उरण टाईम्स आदी वृत्तपत्रांमध्ये त्यांनी काम केले आहे.

सध्या ते आवाज महामुंबईचा चॅनेल मध्ये संपादक असून पत्रकार उत्कर्ष समिती रायगड चे ते जिल्हाध्यक्ष आहेत.
जेथे अन्याय होत असेल तेथे लेखणीने पहिला वार करतात.कोकणातील पर्यटन स्थळांची त्यांनी वृत्तपत्र आणि चॅनेल मधून माहिती दिल्याने कोकणातील पर्यटक वाढले
स्थानिकांना रोजगार मिळाला.त्यांनी आतापर्यंत २६ वेळा रक्तदान केले आहे. वीस हजार वृक्षारोपण मध्ये सक्रीय सहभाग घेतला आहे. न्हावा शेवा आंतरराष्ट्रीय कंटेनर टर्मिनल चा पहिला एम्प्लॉयी ऑफ द इयर हा सन्मान त्यांना मिळाला आहे.धारावी वार्ता , रायगडचा बुलंद आवाज, किनारपट्टी,शिवसत्ता, मी २४ तास, रामप्रहर,श्रमजीवी, श्रमशक्ती आदी वृत्तपत्रांकडून आणि महामुंबई २४ बाय ७ चॅनेल कडून त्यांच्या पत्रकारितेची दखल घेऊन त्यांना सन्मानित करण्यात आले आहे. भारत सरकारचा जनशिक्षण सन्मान, द्रोणागिरी भूषण, पनवेलभूषण, कोकण रत्न आदी पुरस्कारांनी सन्मानित केले आहे.

ते मानव विकास संघ उरण चे तालुकाध्यक्ष, महाराष्ट्र लोककल्याणकारी सेवा संस्था, अमरदीप बालविकास फाऊंडेशन, द्रोणागिरी स्पोर्ट्स असोसिएशन चे प्रसिद्धीप्रमुख असून, सर्वोदय सामाजिक संस्थेचे सचिव, चाईल्ड केअर सामाजिक संस्थेचे सल्लागार, महात्मा फुले आर्ट्स, सायन्स ,कॉमर्स कॉलेज चे माजी विद्यार्थी संघ चे सदस्य आहेत.
सेकंडरी स्कूल चिरनेर दहावी १९८५ ग्रुप चे ते ऍडमिन असून या ग्रुपच्या प्रत्येक सहलीत ते हिंदवी स्वराज्याचे संस्थापक ,रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज यांचा किमान एक किल्ला पाहतात.त्यांनी आतापर्यंत १४३ किल्ले पाहिले असून प्रतापगड ४५ वेळा आणि रायगड किल्ला १४ वेळा पाहिला आहे. महाड.. पोलादपूर मधील दरडग्रस्ताना मदत, रायगड, मुंबई, रत्नागिरी मुंबई जिल्ह्यातील अनेक शाळा आणि वाचनालयांना त्यांनी पाच लाख रुपयांहून अधिक किमतीची पुस्तके भेट दिली आहेत.

श्री राजाराम साळवी साहेब यांनी आगरी समाजातील तंटा मिटविण्यासाठी, त्यांना न्याय देण्यासाठी, गुन्हेगारी मिटविण्यासाठी अनेक संकटाना तोंड देत, सामजिक जाणीव , काळाची गरज लक्षात घेऊन ऑगस्ट 1986 साली आगरी सेनेची स्थापना केली.

आगरी सेनेचे आतापर्यंतचे कार्य म्हणजे झंझावातच आहे.
रेती काढण्यासाठी भत्ता, आयोडिन मिठाच्या सक्तीविरुद्ध आवाज, पूरग्रस्त, दुष्काळग्रस्त, दरड ग्रस्तांना मदत, कोरोना काळात केलेली मदत, चौक रेल्वे स्टेशन, आगरी समाजबांधवांच्या मागे पडू नये म्हणून विशेष प्रयत्न, गुणवंतांचा गौरव अशी सामाजिक कामे आगरी सेनेने केली आहेत.
मिलिंद खारपाटील यांची निर्भीड पत्रकारिता लक्षात घेऊन त्यांची आगरी सेना पत्रकार संघ उरण तालुका प्रमुख पदी निवड जाहीर केली असल्याचे आगरी सेना रायगड जिल्हा प्रमुख श्री सचिन मते यांनी सांगितले.
त्यांच्या निवडीचे संपूर्ण रायगड जिल्ह्यात स्वागत करण्यात येत असून अनेकांनी अभिनंदन केले आहे..
