नवीन बातम्या
आंतरजिल्हा बदलीग्रस्त शिक्षकांचे आझाद मैदानात मुंडन आंदोलन
केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री पदाची दशकपुर्ती निमीत्त   रामदास आठवले यांचा भव्य नागरी सत्कार  
पनवेल महापालिकेच्या स्वतंत्र परिवहन सेवेला शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचा तीव्र विरोध; ‘आधी पाणी, रस्ते आणि पार्किंगच्या समस्या सोडवा’
एसआयआर मोहिमेत बूथस्तरीय अधिकारी घरोघरी न पोहोचल्याचा आरोप; शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांना निवेदन
उलवेच्या समिक्षा मढवीची चमकदार कामगिरी;
रायगडमध्ये चौथा तर पनवेल तालुक्यात प्रथम क्रमांक
उलवे शहर मनसे तर्फे सत्कार.
सापडलेली तीन लाखांची बॅग प्रामाणिकपणे पोलिसांच्या स्वाधीन; महिलेचे साहित्य सुखरूप परत
कॉक्रोच जनता पार्टीच्या मुंबईकर कॉक्रोचेसच्या संघटनात्मक कार्याचा आढावा
गरजू विद्यार्थ्यांना रोटरी क्लब पनवेल सनराईझचा शैक्षणिक मदतीचा हात
युवकांसाठी ‘व्हिजन भारत – जेन झी : संवाद ते संकल्प’ कार्यक्रम; भाजपा प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांची प्रमुख उपस्थिती

इनरव्हील क्लबच्या वतीने रक्तदान शिबीर; ७७ रक्तदात्यांचे रक्तदान



4k समाचार  दि. 2
पनवेल (प्रतिनिधी) इनरव्हील क्लब पनवेल डिस्ट्रिक्ट ३१३ च्या वतीने पनवेल रेल्वे स्टेशन येथे रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिराचे उद्घाटन आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते करण्यात आले. शिबिरात ७७ रक्तदात्यांनी रक्तदान करून उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.  


केईएम ब्लड बँक, पनवेल रोटरी क्लब, कळंबोली रोटरी क्लब, गुरुकुल एज्युकेशन अँड कल्चरल ट्रस्ट आणि साई संस्कार स्पोर्ट्स अँड कल्चरल फाउंडेशन या सर्वांच्या सक्रिय सहकार्य व सहभागाने हा उपक्रम आयोजित करण्यात आला होता.समाजसेवेचा संदेश देणाऱ्या या शिबिराला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. समाजसेवेचा संदेश देणाऱ्या या शिबिराला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला असून विविध स्तरांतून शिबिराचे कौतुक होत आहे. महिलांच्या नेतृत्वाखाली कार्यरत इनरव्हील संस्था सातत्याने समाजहिताचे उपक्रम राबवत असून, हे रक्तदान शिबिर त्याचेच एक प्रेरणादायी उदाहरण ठरले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back To Top