4k समाचार दि. 20
पनवेल (प्रतिनिधी) विद्यार्थ्यांना अधिक चांगल्या पद्धतीने शिक्षण घेता यावे व त्यांचा सर्वांगीण शैक्षणिक विकास साधता यावा या हेतूने इनरव्हील क्लब पनवेल तर्फे नवीन पनवेल येथील सी.के.टी. विद्यालयात ‘नवनीत आयडियल स्टडी अॅप’ वितरणाचा उपक्रम आयोजित करण्यात आला.

या उपक्रमांतर्गत इयत्ता दहावीतील ११३ विद्यार्थी तसेच २ शिक्षकांना या अॅपचा प्रवेश देण्यात आला. दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी विशेषतः तयार करण्यात आलेले हे डिजिटल शिक्षण साधन सर्व विषयांचा सविस्तर अभ्यासक्रम, पुनरावृत्ती व सरावासाठी प्रश्नसंच तसेच दृकश्राव्य माध्यमातून प्रत्येक विषयाचे स्पष्टीकरण अशा वैशिष्ट्यांनी समृद्ध आहे. या प्रकल्पाचा मुख्य उद्देश विद्यार्थ्यांच्या शिकण्यातील तफावत भरून काढणे, शैक्षणिक कामगिरी सुधारण्यास मदत करणे व महागड्या शिकवणीवरील अवलंबित्व कमी करून दर्जेदार अध्ययनसामग्री कुठेही व कधीही उपलब्ध करून देणे हा आहे. सी.के.टी. विद्यालयाचे व्यवस्थापन, शिक्षकवृंद तसेच विद्यार्थ्यांनी या उपक्रमाचे मनापासून स्वागत करून इनरव्हील क्लब पनवेल चे आभार मानले.
