राज्यातील विधानसभा निकालानंतर 8 दिवस उलटूनही सरकार स्थापन झालेले नाही. भाजप महायुतीला 237 जागांचे बहुमत मिळाले असून भाजपने 132, शिंदे गटाने 57, तर अजित पवारांच्या राष्ट्रवादीने 41 जागा जिंकल्या आहेत.

मुख्यमंत्रीपदाचा निर्णय लांबला असला, तरी शपथविधी 5 डिसेंबर रोजी दुपारी 1 वाजता आझाद मैदानावर होणार आहे.

भाजपचा गटनेता 2 डिसेंबरला निवडला जाणार असून देवेंद्र फडणवीस यांचेच नाव निश्चित होण्याची शक्यता आहे. शपथविधी सोहळ्याला पंतप्रधान नरेंद्र मोदी व अन्य दिग्गज नेते उपस्थित राहतील.
