नवीन बातम्या
नवी मुंबईचे पाणी बंद करणार; पनवेल महापालिकेचे विरोधी पक्षनेते अरविंद म्हात्रे यांचा इशारा
आपले अस्तित्व कायम राखण्यासाठी लाईनआळीतील तिन्ही मंडळांनी हातात हात घालून कार्य केले पाहिजे – शिवसेना ज्येष्ठ सल्लागार रमेश गुडेकर
मातोश्रीवर रायगड किल्ला पनवेल विधानसभा पदाधिकाऱ्यांची उद्धव ठाकरे यांना सदिच्छा भेट
मतदार याद्यांचा विशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रमाच्या पूर्वतयारीचा आढावा
नेरूळमध्ये घराचे प्लॅस्टर कोसळले
डायल ११२च्या तत्परतेमुळे महिलेचे प्राण वाचले; धाडसी पोलिसांचा सत्कार
बुधवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, रयत शिक्षण संस्थेचे अध्यक्ष खासदार शरदचंद्र पवार, भाजपचे प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांच्यासह अनेक मान्यवर उलवे नोडमध्ये; लोकनेते रामशेठ ठाकूर अमृतमहोत्सवी अभिष्टचिंतन सोहळा आणि रामशेठ ठाकूर पब्लिक स्कुलच्या इमारतीचे उद्घाटन
उलवेत १३ मे रोजी लोकनेते रामशेठ ठाकूर अमृतमहोत्सवी अभिष्टचिंतन सोहळा; शाळा इमारतीचे उद्घाटन; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, रयत शिक्षण संस्थेचे अध्यक्ष शरदचंद्र पवार, भाजपचे प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांच्यासह अनेक मान्यवरांची लाभणार उपस्थिती
लोकनेते रामशेठ ठाकूर यांचा पत्रकार परिषदेकडून सत्कार

*शिवसेनेतर्फे देण्यात आली पनवेल मधील महापालिका शाळांसाठी सॅनिटरी पॅड वेंडिंग मशिन्स!*


पनवेल मॉडेल’ म्हणत एकनाथ शिंदे यांनी केले तोंड भरून कौतुक… दहा लाखाची तात्काळ मदत जाहीर
“लाडक्या बहिणीचा लाडका भाऊ” अशी ओळख निर्माण झालेले महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री व शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथ शिंदे यांची ही ओळख पुढे घेऊन जाण्यासाठी पनवेलमध्ये महानगरप्रमुख तथा माजी नगरसेवक ॲड. प्रथमेश चंद्रशेखर सोमण यांच्या कल्पनेतून व नेतृत्वात पनवेल शिवसेनेने महापालिका हद्दीतील 11 शाळांमधील गरीब व गरजू विद्यार्थिनींना त्यांच्या आरोग्यासाठी आवश्यक असणारी सॅनिटरी पॅड्स ची व्हेंडिंग मशिन्स दान केली आहेत.

या शाळांमध्ये शिकणाऱ्या अति सामान्य किंवा गरीब गरजू कुटुंबातील मुलींना त्यांच्या मासिक धर्मात आवश्यक असणारी सॅनिटरी पॅड्स आता शाळांमध्येच मोफत मिळणार आहेत. पनवेल महापालिकेच्या अधिकारी स्वप्नाली चौधरी यांनी ही मशीन्स उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते काल त्यांच्या निवासस्थानी स्वीकारली. एकनाथ शिंदे यांनी या उपक्रमाचे तोंड भरून कौतुक केले व ते एवढ्यावरच न थांबता अशाप्रकारे पनवेल शिवसेनेने हा नवीन पायंडा घालून दिला असून हे ‘पनवेल मॉडेल’ म्हणून संपूर्ण महाराष्ट्रात राबवण्यात येईल , सर्व महापालिकांमध्ये तसे आदेश देऊन अशी मशीन्स सर्व शाळांमध्ये बसवण्यात येतील असेही सांगितले तर पनवेल शिवसेनेला हा उपक्रम इतर भागातही सुरू ठेवण्यासाठी ताबडतोब रुपये दहा लाखांची वैयक्तिक मदतही एकनाथ शिंदे यांनी जाहीर केली.

हा उपक्रम यशस्वी करण्यासाठी प्रथमेश सोमण यांच्यासह उपजिल्हाप्रमुख परेश पाटील, महानगर संघटक मंगेश रानावडे, उपमहानगरप्रमुख महेश सावंत यांनी संयुक्त प्रयत्न केले तर उपक्रम यशस्वी करण्यासाठी शिवसेना महिला आघाडी यांनी कंबर कसली. यावेळी पनवेल शिवसेनेच्या संघटनात्मक बाबींवर देखील शिंदे यांचे सोबत चर्चा झाली तर पुढील महापालिका निवडणुकीच्या अनुषंगाने आवश्यक त्या तयारी करण्याच्या सूचनाही एकनाथ शिंदे यांनी सोमण यांना दिल्या.

याप्रसंगी एकनाथ शिंदे यांच्या निवासस्थानी संपर्कप्रमुख राजेंद्र यादव, महिला संपर्कप्रमुख शिल्पाताई देशमुख, उपजिल्हाप्रमुख परेश भाई पाटील, महानगर प्रमुख प्रथमेश सोमण, महिला जिल्हा संघटिका रीनाताई पाटील, महिला तालुकाप्रमुख मंदाताई जंगले, विधानसभा संघटिका यशोदा गायकवाड, धर्मवीर सेनेच्या प्रियांका गाडे, महानगर संघटक मंगेश रानावडे, उपतालुकाप्रमुख सतीश पाटील, तळोजे विभाग प्रमुख प्रकाश म्हात्रे, उपमहानगरप्रमुख सचिन मोरे , महेश सावंत पनवेल शहर प्रमुख प्रसाद सोनावणे, खारघर शहर संघटक इम्तियाज शेख, मायनॉरिटी सेलचे अराफत पटेल, शहर संघटक अभिजीत साखरे, पनवेल शहर महिला संघटिका प्रीती खानविलकर, अर्चना जाधव, कळंबोली शहर संघटिका ज्योतीताई पाटील, उपशहर प्रमुख शैलेश जगनाडे, प्रसिद्धीप्रमुख तोफिक बागवान, विभाग प्रमुख किरण पवार, मंदार काणे यासह पनवेल शिवसेना महानगर मधील इतरही पदाधिकारी शिवसैनिक उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back To Top