कामोठे शहरातील नागरिकांना गेली तीन वर्षे प्रतीक्षा असलेला सेक्टर 18 येथील पेट्रोल पंप आता लवकरच सुरु होण्याची चिन्हे दिसू लागली आहेत.

कामोठे :25 Sep (4K समाचार)आज कामोठे मंडळ भाजपाच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी या पेट्रोल पंपाची पाहणी करून थेट मालकांशी संपर्क साधला. मंडळ अध्यक्ष विकास घरत व समाजसेवक रवी गोवारी यांनी पंप मालकांशी दूरध्वनीवर संवाद साधत अडचणी जाणून घेतल्या.
📌 यातील सर्व अडथळ्यांवर उपाय शोधण्यासाठी आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली सिडको, वन विभाग (CRZ) व पनवेल महानगरपालिका यांच्यासोबत बैठक घेण्यात येणार असल्याची माहिती पदाधिकाऱ्यांनी दिली.

👉 बैठकीत सकारात्मक निर्णय होऊन पेट्रोल पंप नागरिकांच्या सेवेत दाखल होईल असा विश्वास कामोठे मंडळ भाजपाने व्यक्त केला आहे.
🔸 या पाहणीदरम्यान मंडळ अध्यक्ष विकास घरत, हर्षवर्धन पाटील, विनोद खेडकर, सुरेश खरात, भाऊ भगत, जयकुमार डीगोळे, विद्याताई तामखडे, छबीकृष्ण क्षीरसागर, मयूर मोहिते, रवी गोवारी, सुशील कुमार शर्मा, दामोदर चव्हाण, मनोहर शिंगाडे यांसह अनेक पदाधिकारी उपस्थित होते.
