4k समाचार 27
मुंबई गणेशोत्सवाच्या निमित्ताने महाराष्ट्राच्या राजकारणात एक महत्त्वाचा प्रसंग घडला. गेल्या काही दिवसांपासून चर्चेत असलेले उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे हे आज पुन्हा एकत्र आले. उद्धव ठाकरे कुटुंबासह शिवतीर्थ येथे जाऊन राज ठाकरे यांच्या दीड दिवसांच्या गणपतीचे दर्शन घेतले आणि जेवणाचाही मान स्वीकारला.

यापूर्वीच राज ठाकरे यांनी उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त ‘मातोश्री’वर जाऊन भेट दिली होती. त्यानंतर आता गणेशोत्सवात झालेल्या या भेटीमुळे ठाकरे बंधूंच्या नात्यातील दुरावा कमी होत असल्याचे चित्र दिसत आहे.

राजकीय वर्तुळात या भेटीला विशेष महत्त्व दिले जात असून, आगामी मुंबई महापालिका निवडणुकीत शिवसेना (ठाकरे गट) आणि मनसे एकत्र येण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे ठाकरे बंधूंच्या या मनोमिलनामुळे महाराष्ट्राच्या राजकीय समीकरणात मोठा बदल होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
