नवीन बातम्या
उरण नगरपरिषदेत वारस हक्काने १९ सफाई कर्मचाऱ्यांची नियुक्ती. २ वर्षांपासून प्रलंबित प्रश्न नगराध्यक्षा भावनाताई घाणेकर यांच्या प्रयत्नामुळे मार्गी.
*सरगम लायन्स तर्फे तळोजा प्राथमिक शाळेत वाचनालय*
अभिनेते विकास वायाळ यांची दादासाहेब फाळके चित्रपट युनियनच्या महाराष्ट्र प्रवक्तापदी निवड
क्रिकेट प्रशिक्षक दिनेश लाड यांचा रोटरीतर्फे सन्मान
शिक्षक-पालक संघाची स्थापना; मानसी कोकीळ, मनीषा पाटील अध्यक्ष
पनवेलमध्ये भरपावसातही तिरंगा पदयात्रेला उत्स्फूर्त प्रतिसाद; देशभक्तीच्या जयघोषाने शहर दुमदुमले
सिडको अग्निशमन केंद्र खारघर  रेस्क्यू  वर्दी
संतोष पवार यांची पनवेल शहर जिल्हा काँग्रेस एससी विभागाच्या जिल्हाध्यक्षपदी नियुक्ती
आंतरजिल्हा बदलीग्रस्त शिक्षकांचे आझाद मैदानात मुंडन आंदोलन

जरांगे पाटलांचा मराठा मोर्चा मुंबईकडे; पोलिसांकडून ४० अटींसह परवानगी


मुंबई :  4k समाचार दि. 27
मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखालील मोर्चाची आज जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटी येथून मुंबईकडे सुरुवात झाली. पहिल्या टप्प्यात मोर्चाचा मुक्काम जुन्नर येथे होणार असून २८ ऑगस्ट रोजी हा मोर्चा आझाद मैदान, मुंबई येथे पोहोचणार आहे. 


मुंबई उच्च न्यायालयाने दोन आठवड्यांपूर्वीच पूर्वपरवानगीशिवाय आंदोलनास बंदी घातली होती. मात्र, जरांगे यांनी ठाम भूमिका घेत मुंबईत आंदोलन करण्याचा निर्धार दर्शवला आहे..


जालना पोलिसांनी मोर्चासाठी परवानगी दिली असली तरी त्यावर तब्बल ४० अटी लादण्यात आल्या आहेत. या अटींमध्ये जातीय तेढ निर्माण करणारी विधाने न करण्याचे, शस्त्र न बाळगण्याचे, तसेच मालमत्तेचे नुकसान टाळण्याचे स्पष्ट निर्देश दिले आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back To Top