नवीन बातम्या
पनवेल महापालिकेच्या स्वतंत्र परिवहन सेवेला शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचा तीव्र विरोध; ‘आधी पाणी, रस्ते आणि पार्किंगच्या समस्या सोडवा’
एसआयआर मोहिमेत बूथस्तरीय अधिकारी घरोघरी न पोहोचल्याचा आरोप; शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांना निवेदन
उलवेच्या समिक्षा मढवीची चमकदार कामगिरी;
रायगडमध्ये चौथा तर पनवेल तालुक्यात प्रथम क्रमांक
उलवे शहर मनसे तर्फे सत्कार.
सापडलेली तीन लाखांची बॅग प्रामाणिकपणे पोलिसांच्या स्वाधीन; महिलेचे साहित्य सुखरूप परत
कॉक्रोच जनता पार्टीच्या मुंबईकर कॉक्रोचेसच्या संघटनात्मक कार्याचा आढावा
गरजू विद्यार्थ्यांना रोटरी क्लब पनवेल सनराईझचा शैक्षणिक मदतीचा हात
युवकांसाठी ‘व्हिजन भारत – जेन झी : संवाद ते संकल्प’ कार्यक्रम; भाजपा प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांची प्रमुख उपस्थिती
पनवेलचे अनिरुद्ध (मंदार) भिडे यांना आकाशवाणी मुंबईकडून सुगम संगीतासाठी ‘ए ग्रेड’ गायकाचा मान
गायन क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरीची दखल; गुरुजनांसह आई-वडील, पत्नी, कुटुंबीय व शुभचिंतकांप्रती व्यक्त केली कृतज्ञता
विभाजन विभीषिका दिनानिमित्त पनवेलमध्ये डॉ. उदय निरगुडकर यांचा विशेष संवाद
‘१९४७ ची फाळणी आणि आजची वैचारिक फाळणी; नेमकं काय घडलं?’ या विषयावर होणार विचारमंथन

नैना संदर्भात तातडीने बैठक घ्या – आमदार प्रशांत ठाकूर व आमदार महेश बालदी यांची मागणी

पनवेल (4kNews) नैना प्राधिकरणाच्या कार्यपद्धतीसंदर्भात तातडीने बैठक आयोजित करण्याची आग्रही मागणी पनवेल विधानसभा मतदार संघाचे आमदार प्रशांत ठाकूर आणि उरण विधानसभा मतदार संघाचे आमदार महेश बालदी यांनी सिडकोकडे केली आहे. या संदर्भात त्यांनी सिडकोचे उपाध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक यांना निवेदन दिले आहे.  

 या निवेदनात शेतकऱ्यांची भूमिका मांडताना म्हंटले आहे कि, सिडको मार्फत नैना नियोजन प्राधिकरण हद्दीतील अनेक घरे अथवा बांधकामांना अनधिकृत असल्याबाबत निरनिराळया वेळी अनेक नोटीस देण्यात आल्या आहेत.

 वस्तुतः ही सर्व घरे शेतकऱ्यांनी स्वतःच्या जागेत बांधली असल्यामुळे त्यांच्यावर कारवाई करण्याचा इशारा म्हणजे शेतकऱ्यांच्या अधिकारावर होणारे अतिक्रमण आहे. यासंदर्भात वारंवार सुचना देऊनही प्राधिकरणामार्फत एखाद्या जुलुमशहाप्रमाणे सिडको प्राधिकरणाची वागणूक दिसून येत आहे. 

सिडकोला जर नैना परिसरात विकास करायचा असेल तर शेतकऱ्यांना कस्पटासमान वागणूक देऊन सिडको सहकार्याची अपेक्षा करू शकत नाही म्हणुनच यापुढे नैना क्षेत्रात विकास कामासंदर्भात कोणतेही पाऊल उचलण्यापूर्वी पुढील कार्यवाही संदर्भात माहिती देण्यासाठी प्रकल्पातील शेतकऱ्यांच्या प्रतिनिधीसोबत तातडीने एका बैठकीचे आयोजन करावे अशी मागणी त्यांनी या निवेदनातून केली आहे. तसेच शेतकऱ्यांच्या संदर्भात अन्यायकारी भूमिका घेतल्यास सिडको प्रशासनाविरोधात उग्र स्वरूपाचे आंदोलन करण्याचा ईशाराही आमदार प्रशांत ठाकूर व आमदार महेश बालदी यांनी सिडकोला दिला आहे. 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back To Top