नवीन बातम्या
Gutenberg Times: The WordPress 7.2 release squad, WordCamp World, Playground meets WebMCP, and more—Weekend Edition 376
शेकाप व एकता असोसिएशनतर्फे आयुष्मान भारत, आभा कार्ड नोंदणी शिबिर २५० नागरिकांनी घेतला लाभ
महिला संघटन मजबूत करण्यावर निधी शिंदे यांचे मार्गदर्शन
गणेशोत्सवात वाहतुकीचे नियोजन; अतिक्रमण हटविण्यासाठी वाहतूक पोलिस रस्त्यावर पनवेल बाजारपेठेत कोंडी टाळण्यासाठी निर्बंध; ७० कर्मचारी, सात अधिकारी तैनात
श्रावणाच्या साजाला फॅशनचा तडका
‘द रॉयल-श्रावण व्होग’मध्ये कलागुणांचा जल्लोष
सिडकोच्या नोटिसांबाबत कायदेशीर लढ्याची तयारी
सकल मराठा समाज मंडळ, खांदा कॉलनीची बैठक संपन्न
बदलत्या भारताच्या शिक्षणाची नवी दिशा ठरणार
‘द स्कुल्स ऑफ इंडिया समिट २०२६’चे खोपोलीत आयोजन
Mumbai-3 September 2026(Ajit Mohite) RBI Dy Governor Addr at CII NBFC and HFC Summit
करंजा बंदराच्या विकासाला १८० कोटींची चालना!
पुढील तीन महिन्यांत विकासकामांना सुरुवात; मच्छीमारांच्या प्रश्नांना प्राधान्य

भाजपतर्फे ‘दिवाळी संध्या’ सांस्कृतिक सुरेल मैफिलचे आयोजन ; गायन क्षेत्रातील दिग्गजांच्या सुरेल गायनाचा आस्वाद

4k समाचार दि. 15

 भाजपतर्फे ‘दिवाळी संध्या’ सांस्कृतिक सुरेल मैफिलचे आयोजन ; गायन क्षेत्रातील दिग्गजांच्या सुरेल गायनाचा आस्वाद राष्ट्रीय पुरस्कार विजेती सुप्रसिद्ध गायिका आर्या आंबेकर, सुप्रसिद्ध गायक स्वप्नील बांदोडकर यांच्यासह अनेक गायकांच्या सुरेल मैफिली 
पनवेल(प्रतिनिधी) सुश्राव्य गाण्यांची सुरेल मैफिल असलेल्या ‘दिवाळी संध्या’ या सांस्कृतिक मेजवानीचे दरवर्षीप्रमाणे यंदाही लोकप्रिय आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली भारतीय जनता पार्टीतर्फे खारघर, कळंबोली आणि कामोठे परिसरात भव्य आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमांमधून गायन क्षेत्रातील दिग्गज कलाकारांच्या सुरेल गायनाचा मनमोहक आस्वाद रसिकांना मिळणार आहे.   

  

खारघर भाजपच्यावतीने शनिवार दिनांक १८ ऑक्टोबर रोजी सायंकाळी ७ वाजता खारघर मधील गावदेवी मैदानावर तर रविवार दिनांक १९ ऑक्टोबर रोजी सायंकाळी ०७वाजता रोडपाली बस डेपो सेक्टर १६ कळंबोली येथे होणाऱ्या दिवाळी संध्या कार्यक्रमात राधा हि बावरी फेम सुप्रसिद्ध गायक स्वप्निल बांदोडकर, गायक के. शिरीष, गायिका गुल सक्सेना आणि सपना हेमन या प्रसिद्ध गायकांचे गायन सादरीकरण होणार आहे. तर कामोठे भाजपच्या वतीने बुधवार दिनांक २२ ऑक्टोबर रोजी सायंकाळी ७ वाजता लोकनेते रामशेठ ठाकूर विद्यालय सेक्टर ६ कामोठे येथील दिवाळी संध्या कार्यक्रमात राष्ट्रीय पुरस्कार विजेती सुप्रसिद्ध गायिका आर्या आंबेकर यांची सुश्राव्य गायनाची सुरेल मैफिल अनुभवायला मिळेल. भाजपतर्फे दरवर्षीप्रमाणे दिवाळी सणाच्या निमित्ताने संगीत, संस्कृती आणि कलेचा संगम साधणारी ही ‘दिवाळी संध्या’ रसिकांसाठी खऱ्या अर्थाने सांस्कृतिक मेजवानी ठरणार आहे. या कार्यक्रमांमध्ये नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून संगीताचा आनंद घ्यावा, असे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back To Top