नवीन बातम्या
निसर्ग फाऊंडेशन तर्फे जागतिक पर्यावरण दिन साजरा
महापौर नितीन पाटील यांनी प्रभाग १४ मधील नालेसफाई व पावसाळ्यापूर्वीच्या कामांची केली पाहणी
गव्हाणमधील जीर्ण अंगणवाड्यांसाठी नवीन इमारतींची मागणी; पंचायत समिती सदस्या जिज्ञासा कोळींचे सिडकोला निवेदन 
जागतिक पर्यावरण दिनानिमित्त धाकटा खांदा येथे वृक्षारोपण व मोफत रोपवाटप कार्यक्रम उत्साहात संपन्न; जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी यांची प्रमुख उपस्थिती
*”कामोठेकरांच्या आरोग्याशी खेळ? कामोठे कॉलनी फोरमचे दूषित पाण्याविरोधात सिडकोला निवेदन”*
एमडी अमलीपदार्थाच्या तस्करीसह मोक्का लागलेल्या आरोपी पिस्तुलासह अटक
स्वाभिमानी रिपब्लिकन पक्ष युथ रिपब्लिकन रायगड जिल्हा अध्यक्ष महेश साळुंखे यांनी दिल्या हिरामण सुर्वे यांना शुभेच्छा
पनवेल वाहतूक पोलिसांच्या तत्परतेमुळे अपघातग्रस्तांना वेळेत उपचार
पनवेल पालिका हद्दीतील प्रलंबित नागरी प्रश्नाबाबत प्रहार संघटनेची पालिका आयुक्तसोबत बैठक संपन्न !!.

महापौर नितीन पाटील यांनी प्रभाग १४ मधील नालेसफाई व पावसाळ्यापूर्वीच्या कामांची केली पाहणी


4kNews कामोठे  दि. 5
पनवेल (प्रतिनिधी) पनवेल महानगरपालिकेचे महापौर नितीन पाटील यांनी प्रभाग क्रमांक १४ मधील विविध ठिकाणी नालेसफाई व पावसाळ्यापूर्वी सुरू असलेल्या कामांची प्रत्यक्ष पाहणी केली. यावेळी परिसरातील नागरिकांच्या समस्या जाणून घेत संबंधित अधिकाऱ्यांना आवश्यक त्या सूचना देण्यात आल्या. पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर शहरातील सखल भागांमध्ये पाणी साचू नये, नागरिकांना कोणत्याही प्रकारचा त्रास होऊ नये तसेच नाल्यांमधील गाळ व अडथळे तातडीने दूर करण्यात यावेत, यासाठी महापौरांनी अधिकाऱ्यांना निर्देश दिले. विविध ठिकाणी सुरू असलेल्या नालेसफाईच्या कामांचा आढावा घेत कामांची गुणवत्ता आणि गती यावरही त्यांनी भर दिला. 


      प्रभागातील विकासकामे वेळेत आणि दर्जेदार पद्धतीने पूर्ण व्हावीत यासाठी भाजपाचे चारही उमेदवार सातत्याने पाठपुरावा करत येत असून नागरिकांच्या सुरक्षिततेला आणि सुविधांना सर्वोच्च प्राधान्य दिले जात असल्याचे महापौर नितीन पाटील यांनी यावेळी सांगितले. या पाहणी दौऱ्यावेळी पनवेल भाजपा ओबीसी सेल अध्यक्ष सतिश पाटील, माजी नगरसेवक गणपत म्हात्रे, माजी नगरसेविका हेमलता म्हात्रे, भाजपा पनवेल मंडल सरचिटणीस रुपेश नागवेकर, उपाध्यक्ष अतुल भगत, प्रभाग अध्यक्ष गणेश म्हात्रे, भाजपा नेते शैलेश म्हात्रे, रोहीत आठवणे, रुपेश आंबोलकर, अभिजित जाधव, सचिन गमरे, युवा मोर्चा अध्यक्ष कुणाल पाटील व स्थानिक पदाधिकारी, कार्यकर्ते, महानगरपालिका अधिकारी तसेच परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. भाजपा उत्तर रायगड जिल्हा उपाध्यक्ष श्री. मयुरेश नेतकर यांनी सांगितले कि, प्रभाग १४ मधील नागरिकांना पावसाळ्यात कोणत्याही अडचणींचा सामना करावा लागू नये यासाठी महापौर नितीनभाई पाटील यांच्या नेतृत्वाखाली सातत्याने पाठपुरावा केला जात आहे. प्रत्येक प्रश्नाची सोडवणूक करण्यासाठी भारतीय जनता पक्ष सदैव जनतेसोबत उभा आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back To Top