नवीन बातम्या
पनवेलमध्ये राज्यस्तरीय जलसा गीत गायन स्पर्धा; सामाजिक क्षेत्रातील मान्यवरांचा गुणगौरव सोहळा सह्याद्री संस्थेतर्फे आतिष साळवी  आणी नंद कुमार कांबळे यांच्या हस्ते  श्री. राहुल शिवाजी बनसोडे यांचा गुणगौरव पुरस्कार देऊन गौरव
‘स्मृती दिनविशेष राज्यस्तरीय पुरस्कार २०२६’ सोहळा उत्साहात सचिन कांबळे यांच्या हस्ते राहुल शिवाजी बनसोडे यांना सन्मानचिन्ह प्रदान
नैना क्षेत्रात १५ लाख रोजगारनिर्मितीचे उद्दिष्ट; भूमिपुत्रांना प्राधान्य!
राष्ट्र प्रथम’ विचार सर्वदूर पोहोचविण्याची गरज
महापौर नितीन पाटील यांचे प्रतिपादन; ‘शिक्षणाचे डोही आनंद तरंग’ दिवाळी अंकाचे प्रकाशन
सैनिक हो तुमच्यासाठी’ उपक्रमातून जवानांना दिवाळीची भेट भारत विकास परिषद, पनवेल शाखेचा स्तुत्य उपक्रम; यंदा १८ हजार फराळ बॉक्स पाठविणार
उत्तर रायगड कामगार जिल्हा आघाडीच्या नियुक्त्या जाहीर लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते नवनियुक्त पदाधिकाऱ्यांना नियुक्तीपत्रे
पाणीटंचाई रोखण्यासाठी भरत पाटील यांचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन
पनवेल ग्रामीणमधील ज्येष्ठ शिवसैनिकांची वावंजे येथे बैठक
प्रभाग ११ मध्ये अतिक्रमणांवर कारवाईत दुजाभाव का?
आदिवासी महिलांना व्यवसायासाठी जागा द्या; नगरसेविका मेघना घाडगे यांची मागणी

राष्ट्र प्रथम’ विचार सर्वदूर पोहोचविण्याची गरज
महापौर नितीन पाटील यांचे प्रतिपादन; ‘शिक्षणाचे डोही आनंद तरंग’ दिवाळी अंकाचे प्रकाशन

4kNews कामोठे दि. 25

पनवेल (प्रतिनिधी) : राष्ट्रहिताला प्राधान्य देऊन कार्य करणाऱ्या उपक्रमांची आज गरज वाढली आहे. वंचित समाजापर्यंत हिंदुत्वाचा विचार पोहोचला पाहिजे. राष्ट्रीय शिक्षण धोरणाच्या माध्यमातून ‘राष्ट्र प्रथम’ हा विचार सर्वसामान्यांपर्यंत पोहोचत असल्याचे समाधान आहे, असे प्रतिपादन पनवेलचे महापौर नितीन पाटील यांनी केले.



खांदा कॉलनी येथील सी. के. टी. वरिष्ठ महाविद्यालयात सांस्कृतिक वार्तापत्राच्या ‘शिक्षणाचे डोही आनंद तरंग’ या दिवाळी अंकाचे प्रकाशन नितीन पाटील यांच्या हस्ते झाले. यावेळी संस्कृती संवर्धन संस्थेचे उपाध्यक्ष अतुल फडके आणि सहकार्यवाह चिदंबर दीक्षित उपस्थित होते.



प्रास्ताविकात मुख्य व्यवस्थापक सुनीता पेंढारकर यांनी वार्तापत्राच्या २५ वर्षांच्या वाटचालीचा आढावा घेतला. राष्ट्रहिताच्या दृष्टीने महत्त्वाची माहिती दुर्गम भागांतील नागरिकांपर्यंत पोहोचविण्यात वार्तापत्राने योगदान दिल्याचे त्यांनी सांगितले.
कार्यक्रमात राष्ट्रीय शिक्षण धोरणाच्या अंमलबजावणी सुकाणू समितीचे सदस्य संतोष भणगे यांनी मार्गदर्शन केले. भारतीय ज्ञानपरंपरा आणि पंचकोशाधारित शिक्षणातून राष्ट्रप्रेमी विद्यार्थी घडविण्याचे महत्त्व त्यांनी विशद केले. राष्ट्रीय शिक्षण धोरणातील विचार सर्वदूर पोहोचविण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करावेत, असे आवाहनही त्यांनी केले.



राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे कुलाबा जिल्हा संघचालक यांनी अध्यक्षीय समारोप केला. जिल्हा प्रचारप्रमुख अरविंद थापलू यांनी आभार मानले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विवेक मुतालिक यांनी केले. दीपप्रज्वलन व भारतमाता पूजनाने सुरू झालेल्या कार्यक्रमाची सांगता प्रथमेश गोडसे यांच्या आवाजातील पसायदानाने झाली. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी समीर मुलमुले व त्यांच्या सहकाऱ्यांनी परिश्रम घेतले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back To Top