नवीन बातम्या
नवी मुंबईचे पाणी बंद करणार; पनवेल महापालिकेचे विरोधी पक्षनेते अरविंद म्हात्रे यांचा इशारा
आपले अस्तित्व कायम राखण्यासाठी लाईनआळीतील तिन्ही मंडळांनी हातात हात घालून कार्य केले पाहिजे – शिवसेना ज्येष्ठ सल्लागार रमेश गुडेकर
मातोश्रीवर रायगड किल्ला पनवेल विधानसभा पदाधिकाऱ्यांची उद्धव ठाकरे यांना सदिच्छा भेट
मतदार याद्यांचा विशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रमाच्या पूर्वतयारीचा आढावा
नेरूळमध्ये घराचे प्लॅस्टर कोसळले
डायल ११२च्या तत्परतेमुळे महिलेचे प्राण वाचले; धाडसी पोलिसांचा सत्कार
बुधवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, रयत शिक्षण संस्थेचे अध्यक्ष खासदार शरदचंद्र पवार, भाजपचे प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांच्यासह अनेक मान्यवर उलवे नोडमध्ये; लोकनेते रामशेठ ठाकूर अमृतमहोत्सवी अभिष्टचिंतन सोहळा आणि रामशेठ ठाकूर पब्लिक स्कुलच्या इमारतीचे उद्घाटन
उलवेत १३ मे रोजी लोकनेते रामशेठ ठाकूर अमृतमहोत्सवी अभिष्टचिंतन सोहळा; शाळा इमारतीचे उद्घाटन; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, रयत शिक्षण संस्थेचे अध्यक्ष शरदचंद्र पवार, भाजपचे प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांच्यासह अनेक मान्यवरांची लाभणार उपस्थिती
लोकनेते रामशेठ ठाकूर यांचा पत्रकार परिषदेकडून सत्कार

पनवेल तालुक्यात प्रथमच श्रीमद भगवद गीता पठण स्पर्धा


4k समाचार दि. 18

पनवेल (प्रतिनिधी) भारतीय जनता पार्टी पनवेल तालुका, संस्कार भारती पनवेल महानगर, संस्कृत भारती पनवेल आणि श्री गुरुकुलम न्यास यांच्या संयुक्त विद्यमाने “श्रीमद भगवद गीता पठण” स्पर्धेचे आयोजन करण्यात आल्याची माहिती आज (दि. १७) येथे आयोजित पत्रकार परिषदेत देण्यात आली. विशेष म्हणजे प्रथमच अशा स्पर्धेचे आयोजन पनवेलमध्ये करण्यात आले असून अभिनव उपक्रम असलेल्या या स्पर्धेत हजारोंच्या संख्येने नागरिक आणि विद्यार्थ्यांनी सहभाग घ्यावा, असे आवाहन आमदार प्रशांत ठाकूर व भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी यांनी यावेळी केले.   


 पनवेल शहरातील विरुपाक्ष मंगल कार्यालयात झालेल्या या पत्रकार परिषदेला भाजपचे उत्तर रायगड जिल्हा सरचिटणीस नितीन पाटील, गुरुकुलम न्यास अध्यक्ष मंजिरी फडके, संस्कार भारतीच्या जुईली चव्हाण, संस्कृत भारतीच्या अनया करंदीकर, सांस्कृतिक सेलचे जिल्हाध्यक्ष अभिषेक पटवर्धन, श्यामनाथ पुंडे, अमोल खेर, चिन्मय समेळ, गणेश जगताप आदी उपस्थित होते.
 देशाचे लोकप्रिय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त भारतीय जनता पार्टी पनवेल तालुका, संस्कार भारती पनवेल महानगर, संस्कृत भारती पनवेल यांच्या वतीने श्रीगुरुकुलम् न्यासतर्फे आज सकाळी श्री. विरुपाक्ष मंगल कार्यालय येथे “श्रीमद् भगवद् गीता पाठ महायज्ञ” संपन्न झाले.  तसेच एकाच वेळी २०० हुन अधिक जणांनी एकत्र येऊन श्रीमत भगवद गीतेतील सर्व श्लोकांचे लयबद्ध पठण करून गीतेच्या ज्ञानाचा दिव्य अनुभव घेतला. या संस्कारमय कार्यक्रमाच्या अनुषंगाने श्रीमद भगवद गीता पठण स्पर्धेची घोषणा पत्रकार परिषदेच्या माध्यमातून करण्यात आली.


      जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी यांनी  या स्पर्धेविषयी माहिती देताना पुढे सांगण्यात आले कि, ही स्पर्धा पनवेल तालुक्यात मर्यादित असून प्रवेश विनामूल्य असेल. शालेय गट आणि खुला गट अशा दोन गटात स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. स्पर्धक हा पनवेल तालुक्याचा रहिवासी अथवा तालुक्यातील शाळेचा विद्यार्थी असणे आवश्यक आहे. स्पर्धा प्राथमिक आणि अंतिम फेरी अशा टप्प्यांत घेण्यात येणार असून अर्ज दाखल करण्याची अंतिम तारीख १५ ऑक्टोबर २०२५ आहे. अर्ज गुगल फॉर्म किंवा क्यू आर कोडद्वारे सादर करावा.  प्राथमिक फेरी पनवेल शहर, नवीन पनवेल, कळंबोली, खारघर, कामोठे, नेरे आणि उलवे येथे होणार असून सहभागी स्पर्धकांना त्यांच्यासाठीचे स्पर्धा केंद्र १५ ऑक्टोबरनंतर जाहीर केले जातील. त्यानंतर अंतिम फेरी  १३ व १४ डिसेंबर २०२५ रोजी होणार आहे.  शालेय गट इयत्ता ३ री व ४थी साठी अध्याय १२ (भक्ती योग) श्लोक १ ते १०, इयत्ता ५वी ते ७ वी करिता अध्याय १२ (भक्ती योग) संपूर्ण, तर इयत्ता ८ वी ते १०वी साठी अध्याय १५ (पुरुषोत्तम योग) संपूर्ण असे विषय आहेत. तर खुला गटासाठी संपूर्ण श्रीमद भगवद गीता मधील कोणताही श्लोक विचारण्यात येईल. 

खुला गटातील प्रथम क्रमांकास २१ हजार रुपये, द्वितीय क्रमांकाला १८ हजार रुपये आणि तृतीय क्रमांकास १५ हजार रुपये, तर शालेय गटातील इयत्ता ३ री व ४थी मधील प्रथम क्रमांकास ५ हजार रुपये, द्वितीय क्रमांकास ३ हजार रुपये तर तृतीय क्रमांकास २ हजार रुपये,  इयत्ता ५वी ते ७वी मधील प्रथम क्रमांक ११ हजार रुपये, द्वितीय क्रमांकाला ८ हजार तर तृतीय क्रमांकाला ५ हजार रुपये तसेच इयत्ता ८वी ते १०वी मधील प्रथम क्रमांकास १५ हजार रुपये, द्वितीय क्रमांकाला ११ हजार रुपये आणि तृतीय क्रमांकाला ८ हजार रुपये असे बक्षिसांचे स्वरूप आहे. त्याचबरोबर प्रत्येक स्पर्धकाला सहभाग प्रमाणपत्र दिले जाईल, तसेच विजेत्याला सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र प्रदान करण्यात येणार  स्पर्धकांच्या सोयीसाठी संबंधित अध्यायांचे ऑडिओ व पीडीएफ मागणीनुसार उपलब्ध करून दिले जातील, असेही या पत्रकार परिषदेत माहिती देताना नमूद करण्यात आले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back To Top