नवीन बातम्या
वैभव कडू यांच्या पुढाकाराने नागाव गोसपाडा समाजमंदिराची दुरुस्ती श्री बाबदेव मित्रमंडळाने मानले आभार
माणुसकी हाच खरा धर्म : महेंद्रशेठ घरत
नागाव पिरवाडी समुद्रकिनारी स्वच्छता मोहीम उत्साहात
नवी मुंबई-रायगडमध्ये ‘EODR 2.0’चे आयोजन
४० हून अधिक विकासकांचा सहभाग; १,५०० हून अधिक गृहनिर्माण संस्थांना जोडण्याचे उद्दिष्ट
आमदार प्रशांत ठाकूर यांनी सार्वजनिक मंडळांसह घरगुती गणरायाचे घेतले दर्शन
ढोल-ताशांच्या गजरात विमानतळावर अवतरली महाराष्ट्राची लोकसंस्कृती
नगरपरिषद कर्मचाऱ्यांचे प्रश्न मार्गी लागणार; आयुक्त  अभिषेक कृष्णा यांच्यासमवेत संघर्ष समितीची यशस्वी बैठक

रिटघर गावाची ‘एक गाव, एक गणपती’ची ५२ वर्षांची अखंड परंपरा
आदिवासी बांधवांसोबत गणेशोत्सवाचा आनंद; महिला, पुरुष व चिमुकल्यांचा सन्मान
महापौर निवासस्थानी चाफेवाडी, फणसवाडीतील नागरिकांच्या हस्ते गणरायाची आरती; क्रिकेट संघांना क्रीडा साहित्याकरिता आर्थिक मदत

पनवेलमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त श्रीमद् भगवद गीता पाठ महायज्ञ…..


4 k सामाचार दी. 18
पनवेल (प्रतिनिधी) लोकप्रिय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त भारतीय जनता पार्टी पनवेल तालुका, संस्कार भारती पनवेल महानगर, संस्कृत भारती पनवेल यांच्या वतीने श्रीगुरुकुलम् न्यासतर्फे श्रीमद् भगवद गीता पाठ महायज्ञ उत्साहात संपन्न झाला. धार्मिक वातावरणात गीतेच्या श्लोकांचे पठण करून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना निरोगी दीर्घायुष्यासाठी, देश, राज्य व समाजाच्या कल्याणासाठी सामूहिक प्रार्थना करण्यात आली. या संस्कारमय कार्यक्रमाला भाजपचे प्रदेश अध्यक्ष आमदार रवींद्र चव्हाण यांची प्रमुख उपस्थिती लाभली. या महायज्ञाचे आयोजन पनवेलचे आमदार प्रशांत ठाकूर यांच्या सहकार्याने करण्यात आले होते.  


   आज सकाळी श्री. विरुपाक्ष मंगल कार्यालय येथे “श्रीमद् भगवद् गीता पाठ महायज्ञ” संपन्न झाले.  तसेच एकाच वेळी २०० हुन अधिक जणांनी एकत्र येऊन श्रीमत भगवद गीतेतील सर्व श्लोकांचे लयबद्ध पठण करून गीतेच्या ज्ञानाचा दिव्य अनुभव घेतला. सकाळपासूनच भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून गीतेच्या श्लोकांमध्ये सहभाग नोंदवला. यज्ञस्थळी मंत्रोच्चार आणि वेदघोष यामुळे परिसरात एक पवित्र व अध्यात्मिक वातावरण निर्माण झाले होते.यावेळी आमदार प्रशांत ठाकूर, भाजपचे जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी, जिल्हा सरचिटणीस नितीन पाटील, ऍड. प्रकाश बिनेदार, ज्येष्ठ नेते श्रीनंद पटवर्धन, माजी शहर अध्यक्ष अनिल भगत, जयंत पगडे, गुरुकुलम न्यास अध्यक्ष मंजिरी फडके, संस्कार भारतीच्या जुईली चव्हाण, संस्कृत भारतीच्या अनया करंदीकर, सांस्कृतिक सेलचे जिल्हाध्यक्ष अभिषेक पटवर्धन यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते, महिला मोर्चा, युवा मोर्चा यांच्यासह स्थानिक नागरिक उपस्थित होते. 


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back To Top