पनवेल (प्रतिनिधी) सदगुरु वामनबाबा महाराज यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या भूमीत श्री नवनाथ सेवा मंडळ योगीनगर धोंडली यांच्यावतीने ‘श्री गुरुचरित्र पारायण सोहळा व श्री दत्तजयंती उत्सव’ आयोजित करण्यात आला आहे. ७ डिसेंबरला सुरु झालेल्या उत्सवाची परिसंगता १५ डिसेंबर रोजी होणार आहे.

या महोत्सवानिमित्त तळोजे मजकूर योगिनीनगर (धोंडळी) येथील श्रीस्वामी समर्थ मठ मंदिर येथे बुधवार दिनांक ११ डिसेंबर रोजी शास्त्रीय गायन व अभंगवाणी आयोजित करण्यात आली आहे.

रात्री ८ ते १० वाजेपर्यंत शास्त्रीय गायन व अभंगवाणी होणार असून गायक पं. उमेश चौधरी व आसाम येथील गायिका श्रुती बुजरबुरुहा यांचे गायन सादरीकरण होणार आहे. त्यांना तबल्यावर किशोर पांडे, पखवाज सूरज गोंधळी, तालवाद्यावर गुरुदास कदम यांची साथ सांगत असणार आहे.

या कार्यक्रमाचे निवेदन रेवनाथ भाग्यवंत करणार आहेत. तत्पूर्वी सायंकाळी ४ वाजता हभप निवृत्ती महाराज यांचे प्रवचन तर सायंकाळी ५ वाजता सदगुरु वामनबाबा हरिपाठ मंडळ करवले यांचे हरिपाठ तसेच सायंकाळी ०६ वाजता हभप ज्ञानेश्वर महाराज बोगीर (नाशिक) यांचे कीर्तन होणार आहे. त्यांना मृदुंगावर मधुकर धोंगडे व अविनाश पाटील यांची साथ असणार आहे.
