नवीन बातम्या
आदिवासी समाजाच्या सेवेसाठी कटिबद्ध : आमदार विक्रांत पाटील
कामोठे च्या पाण्याचा जटिल प्रश्न सोडवण्यासाठी शेकाप कडून निवेदन
पाणी प्रश्न सोडवण्यासाठी शेकाप नेहमी नागरिकांच्या सोबत नागरिकांच्या आमरण उपोषणाल शेकाप चा जाहीर पाठींबा
धाकटाखांदा गावचे सुपुत्र व उत्कृष्ट क्रिकेटपटू आनंद माळी यांचा ५१ वा वाढदिवस उत्साहात साजरा
आमदार प्रशांत ठाकूर यांच्या वाढदिवसानिमित्त कळंबोलीत विविध सामाजिक उपक्रम; मान्यवरांचा सत्कार
४० वर्षांच्या अन्यायाविरोधात हनुमान कोळीवाडा–नवीन शेवेतील ग्रामस्थांचा निर्धार; १५ ऑगस्टला जेएनपीएसमोर उपोषण
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या उरण मधील नवीन पदाधिकाऱ्यांच्या नियुक्या जाहीर. उरण शहर संघटक पदी  विजय दिलीप जाधव, उपशहरप्रमुख पदी फते खान सोंडे व युवती सेना उरण तालुका संघटिका पदी कु. नेहा रुपेश भगत यांची नियुक्ती.
करंजाडेच्या विकासासाठी आणखी एक ठोस पाऊल!
*केदार भगत यांच्या पुढाकाराने कोळेश्वर विद्यामंदिरात रेनकोट व छत्री वाटप*
*आ. प्रशांत ठाकूर यांच्याकडून आयोजनाचे विशेष कौतुक*
माची प्रबळगडावर रस्ता चुकलेल्या दोन अल्पवयीन पर्यटकांची सुखरूप सुटका.

पनवेल तालुका पत्रकार विकास मंचच्या अध्यक्षपदी मंदार दोंदे यांची निवड 
सरचिटणीसपदी हरेश साठे, उपाध्यक्षपदी राजेंद्र पाटील तर खजिनदारपदी संजय कदम  



पनवेल(4kNews) पत्रकारिता क्षेत्रासोबत सातत्याने सामाजिक व शैक्षणिक उपक्रम राबविणाऱ्या पनवेल तालुका विकास मंचच्या अध्यक्षपदी मंदार दोंदे  यांची सर्वानुमते निवड करण्यात आली आहे.



        पनवेल तालुका पत्रकार विकास मंचची वार्षिक सर्वसाधारण बैठक मंचाचे सल्लागार ज्येष्ठ पत्रकार माधव पाटील आणि अविनाश कोळी व मावळते अध्यक्ष विवेक पाटील यांच्या प्रमुख  उपस्थितीत पार पडली. यावेळी सन २०२५  सालाकरिता कार्यकारिणीची निवड बिनविरोध जाहीर झाली. त्यानुसार ज्येष्ठ पत्रकार माधव पाटील, अविनाश कोळी, विवेक पाटील आणि संजय सोनावणे मंचाचे सल्लागार असणार आहेत. सरचिटणीसपदी हरेश साठे, उपाध्यक्षपदी राजेंद्र पाटील, खजिनदारपदी संजय कदम, कार्यकारिणी सदस्य म्हणून नितीन कोळी, प्रविण मोहोकर, राजू गाडे, दीपक घोसाळकर, तृप्ती पालकर, दत्ता कुलकर्णी, भरतकुमार कांबळे हे जबाबदारी पार पाडडणार आहेत.

 

पनवेल तालुका पत्रकार विकास मंच गेल्या १९ वर्षापेक्षा जास्त कालावधीपासून फक्त पत्रकारिता नाही तर शैक्षणिक आणि सामाजिक कार्य करीत आहे.दरवर्षी विविध शाळेतील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य देण्याबरोबरच शाळांना डिटीजल करण्याच्या दृष्टीने प्रोजेक्टर संच देण्याचे महत्वपूर्ण काम झाले आहे. कुष्ठरुग्णांसोबत दिवाळी साजरी करणे, कर्तृत्वान महिलांचा सत्कार, मातृभाषा दिन, गरिबांना ब्लॅंकेटचे वाटप, अशी व इतर उपक्रमे वर्षभरात होत असतात. समाजहिताचे कार्य करण्यात पनवेल तालुका पत्रकार विकास मंच नेहमीच अग्रणी राहिले आहे. मंचाने दुर्गम भागातही कार्य पोहोचवले आहे. त्या अनुषंगाने हि परंपरा कायम ठेवण्यासाठी यापुढेही सामाजिक व शैक्षणिक उपक्रमे मोठ्या प्रमाणात राबविणार असल्याचे मंदार दोंदे यांनी स्पष्ट केले.







Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back To Top