4k समाचार दि. 20
पनवेल पालिका क्षेत्रात गेल्या तीन दिवसांपासून झालेल्या अवकाळी पावसामुळे मोठ्या प्रमाणावर नागरिकांना सुरक्षित स्थळी हलविण्यात आले आहे. सुमारे ४०० नागरिकांना तात्पुरत्या निवारा केंद्रांमध्ये स्थलांतरित करण्यात आले असून, पालिका प्रशासनाने शाळा व इतर सार्वजनिक ठिकाणी निवारा केंद्रे उभारली आहेत.

पालिका आयुक्त गणेश देशमुख यांनी नागरिकांना आवश्यक त्या सर्व सोयी-सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत. २० ऑगस्ट रोजी रायगड जिल्ह्यात रेड अलर्ट जारी झाल्याने पावसाचा इशारा देण्यात आला होता. त्यामुळे कोणबिवाडा शाळा, उर्दू शाळा, क्रीडा संकुल आणि बुद्ध विहार नवनगर पनवेल येथे नागरिकांना सुरक्षित आश्रय देण्यात आला आहे.
