उरण दि १८(विठ्ठल ममताबादे )
२०१२ साली ३४ ग्राहकांनी उरण तालुक्यातील द्रोणागिरी नोड मध्ये साईनाथ डेव्हलोपर्स या बिल्डर कडे घर खरेदी करण्यासाठी बुकिंग केली होती.तब्ब्ल ३ कोटिहून अधिक रक्कम भरून ग्राहकांनी येथे रूम बुकिंग केले होते. पैसे सुद्धा ग्राहकांनी बिल्डरला अदा केले होते.परंतु साईनाथ डेव्हलोपर्स यांनी सर्वांची फसवणूक करत फरार झाला होता.त्यावेळी सर्व ग्राहक अडचणीत आले होते. संकटात सापडले होते.सर्वच पर्याय वापरले पण पैसे परत मिळत नव्हते.त्यावेळचे खासदार, आमदार, आजी माजी राजकीय नेते यांच्याकडेही न्याय मागितला पण कोणीही न्याय दिला नाही. न्यायालयात सुद्धा ग्राहक गेले पण न्याय मिळाला नाही.ग्राहकांनी तब्ब्ल १२ वर्षे प्रयत्न केले पण त्यांना कोणीही न्याय दिला नाही.

पण तारणहार म्हणून सामाजिक कार्यकर्ते तथा शेतकरी कामगार पक्षाचे उरण विधानसभा मतदार संघांचे अध्यक्ष मयूर सुतार हे देवासारखे सर्वांसाठी धावून गेले.त्यांनी वारंवार प्रयत्न करून सर्व ग्राहकांचे पैसे त्यांना व्याजासकट मिळवून दिले.त्यामुळे सर्व ग्राहकांचे घराचे स्वप्न पूर्ण झाले.मयूर सुतार यांच्या मुळे ग्राहकांना खऱ्या अर्थाने न्याय मिळाला.या कामी मयूर सुतार यांनी कोणत्याही ग्राहकांकडुन किंवा कोणत्याही व्यक्ती कडुन एकही रुपया घेतला नाही. निस्वार्थी पणाने त्यांनी हे कार्य केले आहे त्यामुळे द्रोणागिरी नोड मधील व्ही के राज रेसिडेन्सी द्रोणागिरीच्या सर्व रहिवाश्यांनी मयूर सुतार यांचे आभार मानले आहेत.

किरण घरत , जयवंत भोईर , भगवान भोईर , सुरेश भोईर , अशोक गावडे , सागर कोळी , पुस्पलता देसाई , आंनद कजारिया , कांता भोईर , हितेश पाटील , वैभव पाटील , अजीज नेरेकर , राजश्री म्हात्रे , दीपाली पाटील , गणेश गायकवाड , राजवीर रजोलिया , सुनिल प्रजापती, सुनिल ढोलकीया, राजेश मयेकर आदी रहिवाशी यांनी मयूर सुतार यांचे आभार मानत कृतज्ञता व्यक्त केली आहे .
