उरण दि १८(विठ्ठल ममताबादे )उरण तालुक्यातील सर्वात मोठी ग्रुप ग्रामपंचायत चाणजेच्या उपसरपंचपदी शिवसेना पक्षाच्या (उबाठा) सदस्या सुप्रिया कोळी यांची बिनविरोध निवड दिनांक १८ जुलै रोजी झाली.यावेळी ग्रुप ग्रामपंचायतचे सरपंच अजय म्हात्रे, माजी सरपंच मंगेश थळी, माजी उपसरपंच सोनाली ठाकूर, व्यंकटेश म्हात्रे, श्रीमती कल्पना पाटील, सदस्या मानसी पुरो,उज्वला म्हात्रे,पुष्पा म्हात्रे,प्रमिला म्हात्रे,जागृती कोळी ,
ग्रामपंचायत अधिकारी सुधीर चव्हाण व कर्मचारी वृंद तसेच शिवसेनेचे उपविभाग प्रमुख राजू पाटील, नंदू चव्हाण,परेश थळी , गणेश पाटील इतर पदाधिकारी व ग्रामस्थ उपस्थित होते.सुप्रिया कोळी या विकास कामांना प्राधान्य देणाऱ्या उपसरपंच असून जनतेच्या कल्याणासाठी ते नेहमी झटत असतात. विविध कार्यात नेहमी सहभागी असतात. जनतेत मिळून मिसळून राहतात.ग्रुप ग्रामपंचायत चाणजेच्या उपसरपंचपदी शिवसेना पक्षाच्या (उबाठा) सदस्या सुप्रिया कोळी यांची बिनविरोध निवड झाल्याने सर्वच स्तरातून त्यांच्यावर शुभेच्छा व अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
